आरपीआय माढा तालुक्याच्या वतीने राजाभाऊ सरवदे यांचा सत्कार

कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी निवडी संदर्भात पुणे येथील बालगंधर्व नाट्य मंदिर येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश महातेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राजाभाऊ सरवदे यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे रामदासजी आठवले यांनी घोषित केले.महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आरपीआय माढा तालुक्याच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आरपीआय पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष बापुसाहेब जगताप, पश्चिम महाराष्ट्र सचिव नागनाथ ओहोळ, जयवंत पोळ,माढा तालुकाध्यक्ष मारुती वाघमारे,अमोल गायकवाड,युवा उद्योजक सुरेश ताकतोडे,वैभव ओहोळ,सुरज खरात,धम्मपाल दणाने,बंडु भोसले,पांडुरंग खरात इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment