दिव्यांगाना यू. डी. आय. डी. कार्डमुळे शासकीय योजनेचा फायदा घेणे सोपे होणार - धैर्यशील मोहिते- पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 29, 2022

दिव्यांगाना यू. डी. आय. डी. कार्डमुळे शासकीय योजनेचा फायदा घेणे सोपे होणार - धैर्यशील मोहिते- पाटील

 दिव्यांगाना यू. डी. आय. डी. कार्डमुळे शासकीय योजनेचा फायदा घेणे सोपे होणार - धैर्यशील मोहिते- पाटील

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 

सांगोला (कटूसत्य वृत्त):-  केंद्र सरकारच्या दिव्यांगासाठी असलेल्या योजना थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत अशी इच्छा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे, त्याप्रमाणे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खा.सुजय विखे यांच्या विशेष प्रयत्नातून दिव्यांग व्यक्तींचे हे शिबीर भरविण्यात आले असून लाभार्थीना यु.डी.आय.डी. कार्ड वाटप चालू आहे यामुळे दिव्यांगाना कोणत्याही योजनेचा फायदा घेणे सोपे जाईल असे प्रतिपादन धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.
दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांचे आरोग्य तपासणी शिबिर शनिवार व रविवारी न्यू इंग्लिश स्कूल सांगोला येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या उदघाट्न प्रसंगी मोहिते पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा समाजकल्याण चे सच्चीदानंद बांगर, चंद्रकांत देशमुख, विठ्ठलराव शिंदे, डॉ.सयाजीराव गायकवाड, प्राचार्य लक्ष्मण गावडे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी काळुंगे, आपुलकी प्रतिष्ठान अध्यक्ष राजेंद्र यादव, अरविंद केदार, दत्ता टापरे, संजय गव्हाणे, विकास सावंत, प्रवीण जानकर, गणेश कदम,सतीश दिडवाघ,दौलत खंडागळे, संभाजी पाटील, राजू मगर आदीसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना चंद्रकांत देशमुख म्हणाले की, दिव्यांग असूनही मोठ्या उमेदीने जगण्यासाठी संघर्ष करताना आपण पाहतो. केंद्राच्या व राज्याच्या विविध योजनांचा लाभ घेऊन दिव्यांगाने आपली प्रगती साधावी असे आवाहन त्यांनी यावेळी केली. 
 केंद्र शासन समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर, शिवरत्न शिक्षण संस्था अकलूज व श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय वयोश्री व ए.डी. आय.पी. योजनेअंतर्गत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी कृत्रिम अवयव मिळण्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर दोन दिवस चालणार आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय गव्हाणे यांनी केले. या उदघाट्न कार्यक्रमास विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी व तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages