धाडस सामाजिक संघटना “मातोश्रीच्या” साक्षिने झाली शिवसेनामय - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 9, 2022

धाडस सामाजिक संघटना “मातोश्रीच्या” साक्षिने झाली शिवसेनामय

धाडस सामाजिक संघटना “मातोश्रीच्या” साक्षिने झाली शिवसेनामय

              घोड़ेश्वर (कटूसत्य वृत्त):- एकीकडे शिवसेनेला मोठे भगदाड पडत असताना दुसरीकड़े शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग ही सुरु आहे. महाराष्ट्र राज्यासह गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यात पाच हजार शाखांचा विस्तार असलेली धाडस सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष व त्यांचे हजारो कार्यकर्ते यांनी आज मुंबई येथे शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी उध्दवजी ठाकरे यांच्या हस्ते शरद कोळी यांनी हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

              यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे छोटे बंधु पांडुरंग कोळी, धाडस सामाजिक संघटनेचे सोलापुर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चित्रे, धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हाध्यक्ष नितिन कोळी, संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हाध्यक्ष अशोक घाने, बीड जिल्हाध्यक्ष पलाद आगे, युवक अध्यक्ष बाळासाहेब माने, लातूर जिल्हा अध्यक्षा सौ. प्रीति ताई कोळी, उपाध्यक्षा शालन ताई कोळी, स्नेहा कोळी, सारिका कोळी, तसेच महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातिल धाडसचे जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सोलापुर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, अनेक गावचे सरपंच, ग्रा. पं. सदस्य, धाडसचे अनेक गावातील शाखा प्रमुख यांनी आज शिवसेनेत मातोश्रीवर जाहीर प्रवेश केला त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी धाडस सामाजिक संघटनेच्या कार्याचे कौतुक करून शरद दादा कोळी यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकून कौतुक केले.

              यावेळी अनेकांनी आपल्या मनोगतात शिवसेनेला सोडून शिंदे गटात सामिल झालेल्या मंत्री, आमदार, खासदार व भाजपावर सडकुन टीका केली, उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगीतले कि, हिम्मत असेल तर मध्यावधी निवडनुका घेवून दाखवा आणि सोडून गेलेल्या एका तरी आमदार, खासदाराने निवडून येवून दाखवावे असे आवाहन त्यानी केले, शिवसेना संपविन्याची भाषा करणार्यानी आपले अस्तित्व अगोदर टीकवून दाखवावे, शिवसेना 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकरण करते त्यामूळे शिवसेना अगोदर ही होती, आता ही आहे, पूढ़े ही असनार आहे, तिला कोणिही संपवू शकनार नाही असे त्यांनी ठणकावून सांगीतले यावेळी आमदार निलम ताई गोह्रे, अरविंद सावंत, आमदार अंबादास दानवे, सोलापुर जिल्हा संपर्क प्रमुख कोकीळ साहेब, सोलापुर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दीपक गायकवाड, गणेश वानकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे, व जिल्ह्यातील शिवसेनेचे अनेक नेते पदाधिकारी उपस्थित होते.

              यावेळी, बाळासाहेब कोळी, संपर्क प्रमुख करमाळा–माढा तालुका, अक्षय शिंदे करमाळा ता. अध्यक्ष, वैभव यादव, संदीप राजमाने ग्रा. पं. सदस्य आंबेचिंचोली, प्रभाकर बनसोडे उपसरपंच तेलगांव, दत्तात्रय छत्रे ग्रा. पं. सदस्य तेलगाव, तसेच खालील गाव शाखा प्रमुख सागर साळवे, राहुल रोकड़े तेलगांव, चंद्रकांत खडाखडे सोरेगाव, कृष्णात बळवंतराव वाघोलीवाडी, गणेश गसते वाढेगांव, अर्जुन बंडगे अजनाळे, क्षत्रुगुन पवार सांगेवाड़ी, भारत जाधव, विनायक भोसले, वैभव कुचेकर, विजय मंडले, माणिक कोळी, गणेश गवळी व अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

शरद कोळी यानी शिवसेनेत प्रवेश करताच गद्दारांचा घेतला समाचार

              लहान पणापासूनच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने, प्रेरणेने काम करत असुन कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता शिवसेनेत हजारों कार्यकर्तांसह प्रवेश करत आहे, जीथे अन्याय तिथे आम्ही असतो, धाडस सामाजिक संघटनेच्या माध्यमातुन भरपूर काम केले असुन त्याचा फायदा आता मा. पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी करनार आहे, शिवसेना सोडून गेलेल्या तानाजी सावंत, शहाजी पाटील या गद्दारांना येनार्या काळात धडा शिकविल्याशिवाय गप्प बसनार नाही, शिवसेनेला गतवैभव प्राप्त होईपर्यंत जीवाचे रान करनार आहे, मा. उद्धवजी ठाकरे साहेबांनी धाडस सामाजिक संघटनेच्या कार्याचे कौतुक करून लढ़न्यासाठी ऊर्जा दिल्याने ही ऊर्जा आता राज्यभर सार्थकी लावनार आहे. - शरद कोळी

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages