थोर स्वातंत्र्यसेनानी,देशभक्त, गुरूवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या कार्याचा गौरव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 9, 2022

थोर स्वातंत्र्यसेनानी,देशभक्त, गुरूवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या कार्याचा गौरव

थोर स्वातंत्र्यसेनानी,देशभक्त, गुरूवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या कार्याचा गौरव

                सांगोला (कटुसत्य वृत्त):- राष्ट्रपिता महात्मा गांधी व गांधीवाद यावर प्रचंड निष्ठा असणारे, देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून ब्रिटीशांचा कारावास भोगणारे, समाजऋणाची सर्वथैव जाणीव असणारे व विद्यार्थ्यांच्या मनावर व व्यक्तिमत्वावर रचनात्मक संस्कार करण्यातच आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता मानणारे , देशासाठी जीवन समर्पित करणारे , उपेक्षितांच्या सेवेतच ईश्वर पूजा मांडणारे, देवधर्म आणि कर्मकांड यांचा जाणीवपूर्वक त्या करणारे, गांधी विचारांना प्रमाण मानणारे, श्रमाविना संपत्ती, विवेकाविन सुखोपभोग, तत्वाविना राजकारण, चारित्र्यावेना विद्या,त्यागाविना आराधना या गोष्टींना गांधीजीप्रमाणे पापकृत्य माननारे थोर  स्वातंत्र्यसेनानी, देशभक्त परमपूज्य  कै. गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके  यांनी विद्यार्थी दशेतच महात्मा गांधीजींच्या चलेजाव चळवळीमध्ये सहभाग घेतला होता.यासाठी त्यांना  पुणे येथे येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते.त्याच्या कार्याचा गौरव म्हणून 

                बुधवार दि. १० ऑगष्ट २०२२ रोजी शिवछत्रपती रंगभवन सोलापूर येथे सायं. ५.०० वाजता. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा निमित्त जिल्हाधिकारी कार्यालया, सोलापूर आयोजित मराठी व हिंदी देशभक्तीपर मानवंदना व थोर हुतात्मे, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवान, माजी सैनिक यांचे कुटुंबीयाचे सत्कार  कार्यक्रमामध्ये   गुरुवर्य  चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या कुटुंबीयांचा सत्कार होणार आहे .या निमित्ताने सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांना कुटुंबीयांसह सत्कार समारंभासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.हा सत्कार म्हणजे बापूसाहेबांच्या कार्याचा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त  केलेला गौरव आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages