वाणीचिंचाळे येथे स्व. आबासाहेब तथा गणपतराव देशमुख यांची जंयती विविध उपक्रमांनी साजरी
.jpg)
ग्रामस्वच्छता, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण,विविध क्रिडा स्पर्धेचा माध्यमातून भाई यांच्या विचारांचा जागर
सांगोला (कटुसत्य वृत्त): आज वाणीचिंचाळे येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते आमदार गणपतराव देशमुख यांच्या जंयतीच्या निमित्ताने पुरोगामी युवक संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रतीमेचे पुजन पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रक्तदान शिबीराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते फित कापुन करण्यात आले.यावेळी सरपंच प्रियंका गडहिरे,उपसरपंच लक्ष्मी घुणे,माजी सरपंच चिदानंद स्वामी सर,बाबुराव सोपे,शंकर गडहिरे,शहाजी गडहिरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोलताना बाबासाहेब देशमुख यांनी वाणीचिंचाळे गावाचे कौतुक केले कि आपण आबासाहेबाच्या मार्गाने आपल्या गावाची वाटचाल सुरू आहे. या गावातील ग्रामस्थांनी विविध उपक्रमांनी आबासाहेबाची जंयती साजरी केली आहे. खासकरून रक्तदान शिबीर, विविध क्रिडा स्पर्धा, घेतल्याबद्दल संयोजकाचे कौतुक केले. तसेच गावात राजकारण फक्त निवडणूकीपुरते असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
तसेच सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी वाणीचिंचाळे सारख्या छोट्याश्या गावात विविध स्पर्धा ,तसेच रक्तदान शिबीर असे विधायक उपक्रम राबविले याबद्दल त्यांनी गावकऱ्यांचे कौतुक केले. तसेच अश्या शालेय क्रिडा स्पर्धा आयोजित केल्याने येथील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल आहे असे सांगितले. यावेळी या गटातील अनेक रक्तदात्यांनी मोठ्या हिरारीने रक्तदान करुन सहकार्य केले.
शालेय क्रिडा स्पर्धेत बक्षीस मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच भाई गणपतराव देशमुख यांच्याबरोबर काम केलेल्या जेष्ट नागरिकांचा यावेळी बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिदाचंद स्वामी यांनी केले. तर सुत्रसंचालन जितेंद्र गडहिरे तर आभार प्रदर्शन खरात सर यांनी केले.तसेच यावेळी विकास गडहिरे, चिदाचंद स्वामी,शंकर गडहिरे ,जितेंद्र गडहिरे यांनी मनोगत व्यक्त केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष हणमंत जुजारे ,जितेंद्र गडहिरे ,नामदेव घुणे, रामलिंग पाटील, समाधान झाडबुके,महेश गडहिरे,ग्रामपंचायत सदस्य सचिन गडहिरे, बाळासाहेब बनसोडे ,अजय गडहिरे यांनी परीश्रम घेतले. यावेळी गावातील ग्रामस्थ ,महिला, प्रगती विदयालयाचे विद्यार्थी, शिक्षक वर्ग,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी ,शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या सह आजी माजी पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment