श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सांगोल्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 10, 2022

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सांगोल्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सांगोल्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन.

                 सांगोला (कटुसत्य वृत्त): इस्कॉन पंढरपूर व इस्कॉन नाम हट्ट प्रचार केंद्र सांगोला यांच्या विद्यमाने  सांगोला येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव 2022 चे आयोजन शनिवार 27 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी चार ते रात्री आठ या वेळेत  कविराज मंगल कार्यालय, महुद रोड सांगोला येथे करण्यात आले असल्याची माहिती संयोजकाच्या वतीने देण्यात आली. 

                 यामध्ये सायंकाळी चार ते पाच या वेळेत भजन आणि कीर्तन,  पाच ते सहा या वेळेत दानकर्त्याकडन महाभिषेक, सहा ते साडेसहा या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम त्यामध्ये नाटिका व नृत्य,साडेसहा ते साडेसात या वेळेत श्रीकृष्ण कथा,साडेसात ते आठ या वेळेत भगवंतांना छप्पन भोग अर्पण आणि महाआरती आणि रात्री आठ सर्वासाठी  महाप्रसाद होणार आहे. तरी सांगोला शहर आणि तालुक्यातील भाविक भक्तांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन एस्कान नाम हट्ट प्रचार केंद्र सांगोला यांचे वतीने करण्यात आलेले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages