महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्या पर्यंत संवाद साधनार, पदाधिकारी कार्यकर्त्यांना नवऊर्जा देण्यासाठी शिवश्री सौरभ दादा खेडेकर यांचा महाराष्ट्रभर दौरा नियोजन

सोलापूर (कटुसत्य वृत्त): सदर अभियानांतर्गत सोलापूर जिल्हा दौर्या पासून महाराष्ट्र दौऱ्याची सुरवात. दि.07/08/2022 संभाजी ब्रिगेड सोलापूर पदाधिकारी संवाद आढावा बैठक दिवस दुसरा
करमाळा, बार्शी, मोहोळ, अक्कलकोट, सोलापूर येथील आजी-माजी, नव इच्छुक अश्या सर्व पदाधिकार्यांशी प्रदेश कार्यकारिणी टीमने संवाद साधत सर्वांच्या अडचणी सुचना समजून घेतल्या.
यावेळी येणार्या सर्व निवडणुकांची तयारी करण्याच्या दृष्टीने आदेश देत शिवश्री सौरभ दादा खेडेकर महासचिव संभाजी ब्रिगेड यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी कार्यकर्त्यांची आपुलकीने चौकशी केली त्यांची दुःखे जाणून घेतली त्याच बरोबर कार्यकर्त्यांना नवीन दिशा देण्यासाठी बहुमूल्य असे मार्गदर्शन करून नव चैतन्य निर्माण केले.
तसेच शिवश्री अभिमन्यू पवार प्र. उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख यांनी कार्यकारिणीचा संपुर्ण आढावा घेत जिल्हाध्यक्ष यांना गाव तेथे शाखा तसेच प्रदेश अध्यक्ष शिवश्री मनोज दादा आखरे यांना अपेक्षित असलेले बूथ धोरण राबविण्याचे व त्यासाठी ते स्वतः जातीने लक्ष्य घालणार असल्याचे निक्षून सांगितले.
सोलापूर जिल्हय़ातून संभाजी ब्रिगेडला महाराष्ट्र राज्यातील पाहिले मोठ राजकिय यश मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आव्हान इंजि. मनोजकुमार गायकवाड प्रदेश सह संघटक यांनी केले. यावेळी शिवश्री किरणराज घाडगे पुणे विभागीय अध्यक्ष, शिवश्री दिनेश जगदाळे प्र. कार्यकारिणी सदस्य यांनी सामाजिक व राजकिय बांधणीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
बैठकीचे उत्तम नियोजन शिवश्री सोमनाथ राऊत जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड व शिवश्री सचिन जगताप जिल्हा अध्यक्ष सोलापूर पंढरपूर विभाग यांच्या नेतृत्वात सर्व तालुका जिल्हा पदाधिकारी यांनी केले होते.
यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता सोलापूर जिल्हा शासकिय विश्राम गृह सोलापूर येथे झाली.
No comments:
Post a Comment