स्व. आम डॉ गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त लोकनृत्य स्पर्धा संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 9, 2022

स्व. आम डॉ गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त लोकनृत्य स्पर्धा संपन्न

स्व. आम डॉ गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त लोकनृत्य स्पर्धा संपन्न

                सांगोला (कटुसत्य वृत्त): स्वर्गीय आमदार डॉक्टर भाई गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दि. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता तालुकास्तरीय लोक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  स्वर्गीय आम. डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले संस्था सदस्य प्राध्यापक डॉक्टर अशोक शिंदे सर व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेची करण्यात आली.

                या तालुकास्तरीय लोकनृत्य कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्था सदस्य प्रा. डॉ. अशोक शिंदे प्रा. दीपक खटकाळे प्रा. जयंत जानकर,विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य रघुनाथ फुले सर न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज चे प्रभारी प्राचार्य लक्ष्मण गावडे सर, उपमुख्याध्यापक रामभाऊ बेहेरे सर पर्यवेक्षक प्रा. नामदेव कोळेकर सर राहुल मोरे , दत्तात्रय पांचाळ, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दिनेश शिंदे सर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संतोष राजगुरू व सिद्धोधन कदम  हे मान्यवर उपस्थित होते.

                ही तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धा सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत पार पडल्या. यासाठी सांगोला तालुक्यातून व परिसरातून स्पर्धकांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमासाठी संकुलातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चंद्रकांत माळगे व श्रीपती वगरे व चैतन्य फुले सर यांनी केले तर आभार  प्रा. दत्तात्रय देशमुख यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages