सांगोला नगरपरिषदे मार्फत भव्य "तिरंगा बाईक रॅली" संपन्न ! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 11, 2022

सांगोला नगरपरिषदे मार्फत भव्य "तिरंगा बाईक रॅली" संपन्न !

सांगोला नगरपरिषदे मार्फत भव्य "तिरंगा बाईक रॅली" संपन्न !

३ रंगांच्या वेशभूषेने वेधले शहरवासियांचे लक्ष

                   सांगोला (कटुसत्य वृत्त):- सांगोला नगरपरिषदे मार्फत मागील काही दिवसांपासून शहरात "हर घर तिरंगा" अभियानाचा अत्यंत प्रभावीपणे प्रचार, प्रसार सुरू असून याचाच एक भाग म्हणून नगरपरिषदे मार्फत आयोजित करण्यात आलेली भव्य "तिरंगा बाईक रॅली" अतिशय उत्साहात पार पडली असल्याची माहिती सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

नगरपरिषद कार्यालय पासून सुरुवात झालेली

                   रॅली फुले चौक, वासुद चौक, कडलास चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन, कचेरी रोड, जय भवानी चौक, मिरवणूक मार्गाने जावून तिची नगरपरिषद कार्यालयात सांगता झाली.एका रांगेत केशरी, पांढरा व हिरवा टीशर्ट घातलेले ३ रांगा करून हातात तिरंगा ध्वज घेवून नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी तिरंगी बाईक रॅली काढली होती. भारत माता की जय, वंदे मातरम, हर घर तिरंगा या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. तिरंगी रंगाच्या बाईक च्या रांगा व तिरंगी ध्वजामुळे रॅली चे दृश्य आकर्षक दिसत होते. रस्त्याकडे थांबलेले सर्वजण या रॅली चे दृश्य आपल्या मोबाईल च्या कॅमेरात कैद करताना दिसून आले आणि म्हणूनच "हर घर तिरंगा" अभियानाच्या प्रचारासाठी काढलेली ही रॅली जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला संदेश देवून गेली असे म्हणता येईल.

                   सांगोला शहरातील सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी आपल्या घरावर, दुकानावर ध्वज संहिता पाळून ध्वज फडकवावा हा संदेश या तिरंगा रॅली मधून नागरिकांना देण्यात आला.या रॅलीच्या आयोजनासाठी नगरपरिषदेच्या कार्यालयीन अधीक्षक श्रीमती अभिलाषा निंबाळकर, विजयकुमार कन्हेरे, योगेश गंगाधरे, अमित कोरे,नयन लोखंडे, शरद चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले.

                   सांगोला शहरातील नागरिकांना "हर घर तिरंगा" अभियानाची अधिक माहिती व्हावी आणि प्रत्येकाने दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर,दुकानावर तिरंगा ध्वज फडकवावा या हेतूने या भव्य तिरंगा बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते. यातून प्रेरणा घेवुन सांगोला शहर 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत 'तिरंगी' होईल असा विश्वास वाटतो. - कैलास केंद्रे (मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages