रक्षाबंधनातून सीमेवरील जवानांना सलाम
.jpg)
थेऊर (कटुसत्य वृत्त):- थेऊर चिंतामणी विद्यालयात आज अनोखा रक्षाबंधन उपक्रम साजरा झाला.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या तयार करून सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या जवानांना पाठवल्या. सदर उपक्रमाचे संपूर्ण आयोजन सौ.कंद मॅडम व नरवणे मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक नेवाळे, पर्यवेक्षक खरात उपस्थित होते.सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.शिक्षक भगिनींनी शिक्षक बंधूंना राख्या बांधून आपल्या संस्कृतीचे जतन करून विद्यार्थ्यांपुढे वेगळा आदर्श निर्माण केला. नेवाळे व खरात यांनी रक्षाबंधन या पवित्र सणाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
सो वाडकर , नजन मॅडम , सूर्यवंशी मॅडम , चव्हाण मॅडम , घुमरे मॅडम ,रोटे मॅडम ,कानकाटे मॅडम , तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक या कार्यक्रमास हजर होते.
No comments:
Post a Comment