डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना तालुकाध्यक्ष पदी आनंद दौंडे

कार्याध्यक्षपदी शशिकांत बनसोडे तर उपाध्यक्षपदी मोहसिन मुलाणी व सिद्धेश्वर माने
सांगोला (कटुसत्य वृत्त):- डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक राजा माने यांच्या नेतृत्वाखाली व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुक्यातील कार्यकारणीच्या निवडी संपन्न झाल्या यामध्ये डिजिटल मीडिया संपादक-पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी एस.एफ.एन न्यूज चैनल चे संपादक आनंद दौंडे, कार्याध्यक्षपदी शशिकांत बनसोडे, उपाध्यक्षपदी सिद्धेश्वर माने व मोहसिन मुलाणी तसेच सचिवपदी पांडुरंग पाटील व सहसचिव पदी संतोष साठे यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आली. सदरची निवड ही जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्या निवास स्थानी ठिकाणी संपन्न झाली.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी उपस्थित संपादक आणि पत्रकारांना मार्गदर्शन केले. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सोबतच आता डिजिटल मीडियाही महत्वाची भूमिका बजावत आहे. समाजातील वेगवेगळे प्रश्न डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मांडले जात आहेत. डिजिटल मीडियातील संपादक आणि पत्रकार संघटित राहावेत आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन पातळीवर एकत्रितपणे पाठपुरावा करता यावा यासाठी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले. तसेच डिजिटल मीडियामधील सर्व संपादक, पत्रकारांना एकत्रित करून संघटनेचे बळ वाढवण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यात नवीन पदाधिकारी नियुक्त करण्यात येत असल्याचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.
यावेळी संतोष साठे, उमेश मंडले, शशिकांत बनसोडे, संजय बाबर, किशोर म्हमाणे, संजय माने, चंद्रकांत ऐवळे, शुभम ऐवळे, पांडुरंग पाटील, जगन्नाथ साठे, सुनील वाघमोडे, विकास वाघमारे, रोहित सूर्यागण, अमोल महारनवर यांसह डिजिटल मीडियाचे पत्रकार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment