सांगोला अर्बन बँकेंच्या वर्धापनदिनानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 12, 2022

सांगोला अर्बन बँकेंच्या वर्धापनदिनानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

सांगोला अर्बन बँकेंच्या वर्धापनदिनानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

                  सांगोला, (कटुसत्य वृत्त): स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष व सांगोला अर्बन बँकेंच्या 26 व्या वर्धापनदिनानिमीत्त विविध कार्यक्रम व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेंचे संस्थापक चेअरमन डॉ. प्रभाकर माळी यांनी केले आहे.

                  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमीत्त दि. 13 ऑगस्ट 2022 ते दि. 15 ऑगस्ट 2022 पर्यंत केंद्र व महाराष्ट्र शासनाकडून हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार आहे.  त्या निमीत्त व बँकेंच्या 26 व्या वर्धापनदिन याचे औचित्य साधून शनिवार दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी  महात्मा जोतीबा फुले सभागृह, सांगोला अर्बन बँक, मिरज रोड, सांगोला येथे सकाळी 11.30 वा. पासून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.  रक्तदान शिबीरात भाग घेणार्‍या प्रत्येक रक्तदात्यास बँकेंकडून आकर्षक 2 भेट वस्तू देण्यात येणार आहे.

                  तसेच रविवार दि. 14 ऑगस्ट 2022 रोजी न्यू इंग्लिश स्कूल,वासूद रोड येथे जलद चालण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  पुरुष गटासाठी हि स्पर्धा 5 किलोमिटरची असून सकाळी 6.00 वा. स्पर्धेस सुरुवात होणार आहे.  महिला गटासाठी हि स्पर्धा 3 किलोमिटरची असून सकाळी 6.30 वा स्पर्धेस सुरुवात होणार आहे.  विजेत्या स्पर्धकांना प्रथम क्रमांकास रु. 3000/-, द्वितीय क्रमांकास रु. 2000/- तृतीय क्रमांकास रु. 1000/- तसेच उत्तेजनार्थ दोन विजेत्याना प्रत्येकी रु. 500/- रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.  स्पर्धेत भाग घेणार्‍यांनी 9860214004 या मोबाईल क्रमांकावर विनामुल्य नांव नोंदणी करावेत.

                  सोमवार दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी वर्धापन दिनानिमीत्त बँकेंच्या मुख्यालयात गुणवंताचा सत्कार व वरील स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण कार्यक्रम मा. डॉ. बाबासाहेब देशमुख, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र पुरोगामी संघटना यांच्या शुभहस्ते व बँकेंचे संस्थापक चेअरमन डॉ. प्रभाकर माळी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले असून बँकेंचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, खातेदार व नागरिकानां उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेंचे संस्थापक चेअरमन डॉ. प्रभाकर माळी व तज्ञ संचालक सीए किसन माळी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages