भोसरे घरकुल वसाहतीत तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 12, 2022

भोसरे घरकुल वसाहतीत तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप

भोसरे घरकुल वसाहतीत तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप

                  कुर्डुवाडी(कटुसत्य वृत्त) :- भारतरत्न डॉ. बाबासहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ व आशिष रजपूत मित्र परिवाराच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा या योजने अंतर्गत जयंती उत्सव मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.आशिष रजपूत यांच्या संकल्पनेतून भोसरे येथील घरकुल वसाहत,पारधी वसाहत व अदिवासी वसाहतीमध्ये मोफत तिरंगा झेंड्याचे वाटप आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष माजी नगरसेवक अमरकुमार माने,महार रेजिमेंटचे माजी सैनिक माणीक आखाडे, वायू रक्षा रेजिमेंटचे माजी सैनिक सुरेश इंगळे,लव्हे गावचे सरपंच अमित गायकवाड,दशरथ कांबळे, पारधी समाजाचे माढा तालुकाध्यक्ष रवी भोसले, दशरथ कांबळे,आरपीआय कवाडे गटाचे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब हिवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. अर्जून गाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी गणेश समदाडे, सतिश गाडे,किरण बनसोडे, युवराज वाघचौरे,आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोहेल तवकल, केतन मिठे,उमेश मोरे,सहदेव बिराजदार,राहूल बनसोडे,राहूल हनवते आदींनी परिश्रम घेतले.

                  कार्यक्रमाचे प्रास्तविक  प्रा.डॉ.आशिष रजपूत यांनी केले तर आभार युवराज हिवाळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages