थोर स्वातंत्र्यसेनानी,देशभक्त, गुरूवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या कार्याचा गौरव

प्रा.झपके यांचा कुटुंबियांसह जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सन्मान
सांगोला (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रपिता महात्मा गांधी व गांधीवाद यावर प्रचंड निष्ठा असणारे, देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून ब्रिटीशांचा कारावास भोगणारे, समाजऋणाची सर्वथैव जाणीव असणारे व विद्यार्थ्यांच्या मनावर व व्यक्तिमत्वावर रचनात्मक संस्कार करण्यातच आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता मानणारे , देशासाठी जीवन समर्पित करणारे , उपेक्षितांच्या सेवेतच ईश्वर पूजा मांडणारे, देवधर्म आणि कर्मकांड यांचा जाणीवपूर्वक त्या करणारे, गांधी विचारांना प्रमाण मानणारे, श्रमाविना संपत्ती, विवेकाविन सुखोपभोग, तत्वाविना राजकारण, चारित्र्यावेना विद्या,त्यागाविना आराधना या गोष्टींना गांधीजीप्रमाणे पापकृत्य माननारे थोर स्वातंत्र्यसेनानी, देशभक्त परमपूज्य कै. गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांनी विद्यार्थी दशेतच महात्मा गांधीजींच्या 'चलेजाव' चळवळीमध्ये सहभाग घेतला होता. पुणे शहरातील 'चलेजाव' चळवळीच्या सभा , मिरवणुका यामध्ये त्यांनी सहभाग घेतला. यासाठी त्यांना पुणे येथे येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते.त्याच्या कार्याचा गौरव म्हणून
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा निमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर आयोजित मराठी व हिंदी देशभक्तीपर मानवंदना व थोर हुतात्मे, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवान, माजी सैनिक यांचे कुटुंबीयाचे सत्कार नुकताच मा. प्रा. श्रीकांत येळेगांवकर यांचे उपस्थितीत व मा. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.कार्यक्रमामध्ये सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,सौ.शीला झपके, विश्वेश झपके,सौ.प्रार्थना बिज्जरगी या झपके कुटुंबियांचा सन्मान झाला. हा सत्कार म्हणजे बापूसाहेबांच्या कार्याचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केलेला गौरव आहे.
No comments:
Post a Comment