लोटेवाडी विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या वतीने विनामूल्य ध्वज वाटप

सांगोला (कटूसत्य वृत्त):- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'हरघर तिरंगा झेंडा' या उपक्रमात नागरिकांचा सहभाग वाढावा,यासाठी लोटेवाडी विविध कार्यकारी विकास सोसायटी वतीने लोटेवाडी येथील,ग्रामस्थ नागरिकांना व सभासदांना विनामूल्य तिरंगा ध्वज वाटप करण्यात आले. देशभक्तीची जाज्वल्य भावना नागरिकांच्या मनात कायमस्वरूपी रहावी या उद्देशाने गावातील तमाम नागरिकांना बोलवून एकत्रित रित्या हातामध्ये झेंडे घेऊन देशभक्तीपर घोषणा देऊन दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे हर घर झेंडा हा उपक्रम राबवण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन सागर लवटे यांनी दिली. सदर कार्यक्रमाला व्हाईस चेअरमन पंढरी देशमुख सर्व संचालक मंडळ भीमराव लवटे, सुभाष लवटे, नामदेव लवटे, धनाजी मेजर शेंबडे,तानाजी मोटे, अण्णा मोरे ,प्रसाद लवटे, प्रकाश लवटे, किसन ढेरे, राजेंद्र हजारे, वैभव शेंबडे, वैभव ढेरे, लिंगप्पा लवटे, ऋषिकेश गवळी,रामहरी गवळी, सुरेश सावंत, अण्णा पाटील, सत्यवान देशमुख,मधुकर लवटे ,आप्पा सरगर ,राजेंद्र सरगर इत्यादी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment