भारताचा राष्ट्रध्वज देशाच्या नागरिकांना एकजूट करीत राष्ट्र सेवेसाठी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 15, 2022

भारताचा राष्ट्रध्वज देशाच्या नागरिकांना एकजूट करीत राष्ट्र सेवेसाठी

 भारताचा राष्ट्रध्वज देशाच्या नागरिकांना एकजूट करीत राष्ट्र सेवेसाठी

प्रेरणा देते - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम. रामदास आठवले

मुंबई (नासिकेत पानसरे):- सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाजकल्याण आयुक्तालय, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण विभाग, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग मुंबई शहर व मुंबई उपनगर, किन्नर माँ व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने "फडकवुया घरोघरी अशोक चक्रांकित तिरंगा, नशामुक्त जीवन ही चंगा, अमृत महोत्सवी स्वातंत्र्याचा क्षण, आमचा नशामुक्त भारताचा प्रण" हा संदेश देण्याच्या उद्देशाने रविवार, १४ आँगस्ट २०२२ रोजी दुपारी ०२.३० ते ०४.०० वाजेपर्यंत सिएसएमटी बस डेपो बाहेर, मुंबई येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांनी नशा मुक्त भारताचा संदेश दिला. "भारताचा राष्ट्रध्वज देशाच्या नागरिकांना एकजूट करीत राष्ट्र सेवेसाठी प्रेरणा देते " असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम. रामदास आठवले यांनी आपल्या शुभ संदेशात म्हटले होते. 
नशामुक्त भारत अभियानाची प्रस्तावना करत अमोल स. भा. मडामे  यांनी देशभरात चाललेल्या व्यसनमुक्तीच्या कार्याची माहिती दिली. सदर कार्यक्रमात समाजकल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी वृंद यांनी उपस्थित राहुन कार्यक्रमात सहभाग घेतला तर कार्यक्रमाचे आकर्षण म्हणुन स्वातंत्र्यामुळे प्राप्त झालेल्या अधिकारांमुळे मिळवलेल्या भारतमाता, न्यायाधिश, वकील, डाँक्टर, नर्स, पोलीस, आरोग्य सेवक, वैमानिक, इंजिनियर यशस्वी व्यक्तीमत्वांची मांडणी तृतीयपंथी साथी वेगवेगळ्या वेशभुषा करुन सादरीकरण करुन उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच नशा - एक नाश हे पथनाट्य सादर करून लोकांचे लक्ष केंद्रित केले. किन्नर माँ ट्रस्ट चे सलमा खान यांनी 'किन्नर समाजास संविधानामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. तिरंगा सर्वाना एक समान संधी व देशभक्ती ची भावना निर्माण करते असे सांगितले. 
 यावेळी पार्श्वगायिका ज्योती चौहान यांनी देशभक्ती व व्यसनमुक्ती वर गीत सादर करून भावनिक वातावरण निर्माण केले. व्यसनमुक्तीच्या भव्य पोस्टर्स प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. त्यावेळी मा. प्रसाद खैरनार (सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण मुंबई शहर)यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. त्यावेळी व्यसनमुक्ती प्रचार पत्रकांचे वाटप करण्यात आले. सदरच्या व्यसनमुक्ती व स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला मुंबईकरांनी भरघोस प्रतिसाद देत सहभाग देऊन व्यसनमुक्तीचा संकल्प केला.नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी मान्यवरांचे आभार n व्यक्त करत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सदिच्छा व्यक्त केल्या तर सूत्रसंचालन नशाबंदी मंडळाचे सुनिल चव्हाण यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages