कुर्डुवाडीच्या राजकीय,सामाजिक क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्व; डॉ.मोहसीन मकणू

कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):- समाजकारण व राजकारणाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना एकत्र करून आपुलकी व स्नेह निर्माण करून राजकारणाचा पायंडा घालून विकासाचे ध्येय घेऊन वाटचाल करणारे मकणू कुटुंबीय शहरातील सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,सांस्कृतिक तसेच प्रशासकीय सेवेत अग्रेसर असणाऱ्या घराण्यात डॉ.मकणू यांचा जन्म झाला.
मागील दशकापासून शहराच्या राजकारणात डॉ.मोहसीन मकणू यांचे नाव नव्याने उदयास आले आज ते वयाची ३८ पूर्ण करीत आहेत यांचे जीवन अनेक ओतप्रोत घटकांनी भरलेले सन २००९ साली पहिल्याच प्रयत्नात मिरजेतून डॉक्टरकीची पदवी संपादन केली त्यांनतर ते कुर्डुवाडी सारख्या छोट्याश्या शहरामध्ये येऊन ओपीडीची स्थापना केली नफा ना तोटा या तत्वावर व्यवसायास सुरुवात करून सर्वरोग निदानावर अल्प खर्चात औषधोपचारासह तपासणी करू लागल्याने गावपातळीवर नावाजले गेले कालांतराने कार्याची बढती वाढु लागल्याने ते आज होमिओपॅथी स्पेशालिस्ट म्हणून जिल्हया भरातील रुग्णांना परिचित आहेत.
सन २०१२ साली ते नुकतेच समाजकारणात सक्रिय झाले तेव्हापासून ते आजतागायतपर्यंत ते समाजसेवक म्हणून कार्यरत राहिले गेली वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यात ते अग्रेसर राहिले तसेच समाजसेवेच्या माध्यमातून जयंती उत्सवासह अनेक लोकहिताची कामे करत समाजापुढे एक आदर्श निर्माण करून स्वतःच्या कमाईतून मिळणाऱ्या रकमेचा वाटा केवळ स्वतःचा नसून समाजातील प्रत्येक घटकांचा असतो हे दाखवत समाजसेवेचा ठसा आणि वसा पुढे नेहण्यात यशस्वी झाले.
जनतेच्या अग्रहाखातर डॉ.मकणू यांनी २०१६ साली राजकारणात पाऊल टाकले शिवसेनेकडून उमेदवारीही मिळाली राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील निवडणूकीत सहभागी झाले मात्र अल्प मताने पराभव पत्करावा लागला पारदर्शक कामाची पद्धत,दांडगा जनसंपर्क ठेवण्याच्या कलेमुळे त्याचवेळेस शहराच्या राजकारणात नावलौकिक झाले.
संघटन,कार्य,कौशल्याच्या जोरावर खचून न जाता जनतेची सेवा करण्यासाठी पुन्हा २०१७ सालापासून नव्या जोमाने उभे राहिले रक्तदान शिबीरे,सर्वरोग निदान मोफत उपचार,शालेय साहित्य वाटप,विविध स्पर्धा,महिला दिन यासारखे उपक्रम राबवून उत्साहात साजरे केले २०२० साली देशभरात कोरोनासारखे महाभयंकर संकट आले संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने सगळीकडे लॉकडाऊन सुरू होते अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योगधंदे बंद असल्याने रोजंदारीवर जीवन जगणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली त्यावेळी एक हात मदतीचा ही संकल्पना शेरे मैसूर टिपू सुलतान सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू करून प्रभागातील जनतेला मोफत अन्नदानाचे किट,आर्सेनिक अलबम गोळ्यांचे वाटप करत माणुसकीचा संदेश घडवून आणण्यात डॉक्टरांचा मोलाचा वाटा निदर्शनास आला.
तसेच मागील दहा वर्षांच्या कालखंडात डॉक्टरांनी केलेल्या कार्याची पोच सन २०२१ ला माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोलापूरात मिळाली यापूर्वी ते विविध पुरस्काराचे मानकरी ठरले या कर्तृत्वाच्या जोरावर यंदाच्या कुर्डुवाडी नगरपालिका निवडणुकीत पुनश्च एकदा नशीब आजमावणार असल्याचे समजते अद्यापपर्यंत डॉक्टरांचा निर्णय गुलदस्त्यात असल्याचे बोलले जाते समाजसेवक डॉ.मोहसीन मकणू आज ३९ वर्षाचे होत आहेत आजही ते नव्या जोमाने कार्यरत आहेत कर्तृत्ववान माणसांचे वाहवा करणे ही आपली संस्कृती आहे.
No comments:
Post a Comment