आजादी का अमृत महोत्सव निमित्त गीत गुंजन देशभक्तीपर गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-ऐ मेरा इंडीया आय लव्ह माय इंडिया, ये मेरे वतन के लोंगो जरा आँख मे भर दो पाणी, मेरे देश की धरती सोना उगले हिरे मोती अशा देश भक्ती पर सदाबहार गितांचा आजादी का अमृत महोत्सव पर्यटन व सांस्कृतिक कार्य संचनालय केंद्र, महाराष्ट्र शासन व मोहोळ नगरपरिषद मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोळ शहरातील दोन्ही डोळ्याने दिव्यांग कलाकारांनी देशभक्तीपर गीतांचा गीत गुंजन कार्यक्रम सादरी करून मोहोळकरांची मने जिंकली.
मोहोळ परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके, उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोहोळ शहरातील नाट्य कलावंत अमोल महामुनी यांनी दिव्यांग कलाकारां च्या कला सादरीकरणास शासन स्तरावर प्रतिसाद मिळावा याकरिता रेडिओ स्टार कलाकार यांना एकत्रित करून मोहोळ नगरपरिषदेच्या आजादी का अमृत महोत्सव या मोहिमेंतर्गत सहभागी होत रेडिओ स्टार दिव्यांग कलाकार सैपन शेख, तानाजी खंदारे , पेटी वाद्यक बाल कलाकार कु. सुरभी गव्हाणे, संस्कार महामुनी, कु. वैष्णवी महामुनी, रुपेश घाडगे या कलाकारांनी हृदयस्पर्शी गाणी गाऊन मोहोळ शहरवासी यांचे मने जिंकत स्वातंत्र्याच्या स्मृती जागृत केल्या व नागरिकांनी कलाकारांचे भर भरून कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी कार्यक्रम समन्वयक हर्षल माने, सुवर्णा हाके, दिनेश गायकवाड, किशोर स्वामी, नागर तलारी, मोहोळ नगरपरिषदेचे तिरंगा व्हॉलंटिअर अमोल महामुनी, राजन घाडगे व नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी यांनी उत्तम नियोजन करित कार्यक्रम यशस्वी केला.

No comments:
Post a Comment