
सांगोला (कटूसत्य वृत्त):- सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी,मेथवडे या महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन करून यशस्वीरीत्या संपन्न झाले. केंद्र सरकारने स्वतंत्रयाचा अमृतमहोत्सव १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत पार पडला आता त्यानंतर राज्य सरकारने स्वराज्य सप्ताह अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम राबवणार आहे.त्याअंतर्गत १७ ऑगस्टला सकाळी ११ वाजता शासकीय आणि खाजगी कार्यालयात तसेच शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था विद्यापीठे येथे समूह राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम राबवला जाणार आहे.त्यानुसार सह्याद्री फार्मसी महाविद्यालयात स्वराज्य सप्ताह अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम घेण्यात आला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील,सर्व विद्यार्थी ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.सर्व विद्यार्थ्यांचा यावेळी उत्स्फूर्त सहभाग दिसला .
No comments:
Post a Comment