अकलूज नगरीत देशभक्तीचा "जय"घोष तर महादिव्य "स्वरूपा" बरोबरच सोहळ्याचा भव्य "संग्राम" संपन्न... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 18, 2022

अकलूज नगरीत देशभक्तीचा "जय"घोष तर महादिव्य "स्वरूपा" बरोबरच सोहळ्याचा भव्य "संग्राम" संपन्न...

 अकलूज नगरीत देशभक्तीचा "जय"घोष तर महादिव्य "स्वरूपा" बरोबरच सोहळ्याचा भव्य "संग्राम" संपन्न...


अकलूज (विलास गायकवाड):- अतुट आत्मविश्वासाच्या बळावर अत्यंत अवघड आणि अशक्य कार्य करून दाखवलेत असे सुसंस्कारित बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्व जयसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवी सोहळ्याची प्रशंसा अखंड देशपातळीवर होऊ लागली असून राज्याच्या धर्तीवरही सरस असाच स्वातंत्र्य दिन सोहळा ठरला आहे.


14 ऑगस्टच्या सांजवेळी मनमोहक रंगीत रोषणाईला मिळालेली चंद्राच्या मंदप्रकाशाची साथ हे अनोख्या मैत्रीचे दर्शन घडवीत होते तर याला साक्षी ठेवून अकलूजच्या सहकार नगरीत अतुलनीय असाच मनमोहक स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उमंगतेने साजरा करण्यात आला.या सोहळ्यात विविध संस्थेच्या वतीने साकारण्यात आलेले देशभक्तीचे चित्ररथ हळव्या मनाला निर्भीड करीत होते तर रथा समोरचे संचलन दृश्य हृदयाला स्पर्श करत होते. यातील घोषपथक, अश्वपथक तरुणाईच्या श्वासात देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतवत होते. स्वातंत्र्य दिन सोहळा उत्सवाचे विहंगम असेच सुंदर वैभव पाहण्यासाठी आणि हृदया बरोबरच मोबाईल मध्ये विहंगम सुंदर दृश्य टिपण्यासाठी देशभक्तांचा महासागर सोहळ्यात सहभागी झाला होता.यावेळी अखंड आसमंत या  सोहळ्याचा आनंद घेत होता.कारण सोहळ्याच्या चार दिवस आधी पावसाची रिमझिम विसावली होती. तरीही पावसाशी लढणारा बलवान असाच 200 फुटाचा वॉटरप्रूफ मंडप उभा केला होता. परंतु निसर्गाने या सोहळ्याला दिलेली साथ अधिकचा आनंद वाढवून गेली.
लाखो जनमनांची मने जिंकणारे, मोहिते पाटील कुटुंब आणि या कुटुंबातील जयसिंह मोहिते पाटील यांनी नेहमी कलेचा आदर करीत त्याची उन्नती केली आहे. आशिया खंडात तोडीस तोड असे  अनेक उपक्रम त्यांनी यशस्वी करून दाखवलेत. त्यांनी राबवलेल्या उपक्रमांचा देश पातळीवर, राज्य पातळीवर नेहमीच इतिहास घडला आहे. जयसिंह मोहिते पाटील यांनी राबवलेल्या उपक्रमांमुळे नेहमी अकलूजच्या व्यवसायातही भर पडतेच परंतु वेगवेगळ्या व्यवसायांबरोबर गोरगरिबांच्या हातालाही काम मिळते आणि यामुळेच जयसिंह मोहिते पाटील यांच्या उत्कृष्ट नियोजनाचे आणि आयोजनाचे नेहमीच देश पातळीवर राज्य पातळीवर कौतुक झाले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages