विजयराज (दादा) डोंगरे सभापती,अर्थ व बांधकाम यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षा पुस्तक वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, August 21, 2022

विजयराज (दादा) डोंगरे सभापती,अर्थ व बांधकाम यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षा पुस्तक वाटप

विजयराज (दादा) डोंगरे सभापती,अर्थ व बांधकाम  यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षा पुस्तक वाटप

               घोड़ेश्वर (कटुसत्य वृत्त):– आज जि.प प्रा शाळा कोथाळे येथे विजयराज (दादा) डोंगरे सभापती,अर्थ व बांधकाम  यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षा पुस्तक वाटप करण्यात आले

               भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्रदिन साजरा होत असताना कोथाळे गावचे मा.उपसरपंच विवेक पाटील यांच्या संकल्पनेतून इ 5 वी ते 8 वी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारी व्हावी म्हणून  स्पर्धा परीक्षा पुस्तके वाटप करण्यात आली.यात पूर्व माध्यमिक व माध्यमिक मार्गदर्शिका 18 संच, नवोदय परीक्षा आणि N M M S परीक्षा तयारीचे प्रत्येकी 2 संच देण्यात आले. तसेच स्पर्धा परीक्षा तयारीसाठी विद्यार्थ्यांना आणखी प्रोत्साहन मिळावे म्हणून आपले पिताश्री कै.हरिश्चंद्र जयसिंग पाटील यांच्या स्मरणार्थ पुढील वर्षापासून स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणार्या विद्यार्थ्यांना रोख 501 रू चे पारितोषक देण्याचे जाहीर केले. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारी व्हावी यासाठी राबविलेल्या हा नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.

               यावेळी सरपंच दत्तात्रय मोटकुळे, उपसरपंच सविता पवार, राजेश (आप्पा ) पवार, माजी उपसरपंच विवेक पाटील, श्री विकास पवार, गावचे पोलीस पाटील ज्ञानेश्वर पवार, SMC अध्यक्ष दादा बचुटे, माजी सरपंच पांडूरंग माने, सुरेश बापू विशाल पवार पैलवान शशिकांत चौधरी जरपवार उमेश पाटील अक्षय सावंत राहुल पवार सचिन पाटील सर्जेराव पवार तलाठी  महाडिक भाऊसाहेब, मुख्याध्यापक मधूकर जाधव, शिक्षक चरण शेळके, तापसिंग वसावे,श्रीनिवास राजमाने, नेताजी रणदिवे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages