पंढरपुरात माजी पंतप्रधान स्व.राजीवजी गांधी यांची जयंती साजरी

पंढरपूर (कटुसत्य वृत्त): विज्ञान युगाचे जनक भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस हार घालून पूजन संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे वंशज ह.भ.प.नामदास महाराज यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी स्व.राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले असून गांधी कुटूंबाने मोठा त्याग केला असून तो कधीही न विसरण्यासारखे आहे. सध्या पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे कार्य माजी केंद्रीय गृहमंत्री मा.ना.सुशिलकुमार शिंदे साहेब, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील व माजी पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रकाशतात्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. कॉंग्रेस पक्षाचे विचार, ध्येयधोरणे तळागाळात पोहोचविणार असल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटी ब्राह्मण सेलचे अध्यक्ष दत्तात्रय बडवे-शिंदे यांनी केले.
यावेळी पंढरपूर स्वातंत्र्य सैनिकांचे वंशज मिलिंद अढवळकर, माजी शहराध्यक्ष सुहास भाळवणकर, माजी शहर उपाध्यक्ष नागनाथ अधटराव, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते देवानंद इरकल, माजी शहराध्यक्ष नागेश गंगेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे माजी उपाध्यक्ष संतोष ताठे, मागासवर्गीय सेलचे चंदनशिवे आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन मिलिंद अढवळकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार देवानंद इरकल यांनी मानले.
No comments:
Post a Comment