मोहोळ तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी रामदास गरगडे तर उपाध्यक्षपदी रमेश नगरे

घोड़ेश्वर (कटुसत्य वृत्त):– मोहोळ तालुका फोटोग्राफर असोसिएशन यांचे कडून मूकबधिर मुलांचे शाळा मोहोळ येथे शालेय विद्यार्थ्यांना टी-शर्ट व खाऊ वाटप करण्यात आले,
कार्यक्रमाची सुरुवात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली नंतर नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आली त्यामध्ये नूतन अध्यक्ष म्हणून रामदास गरगडे, उपाध्यक्ष रमेश नगरे, सचिव बाळासाहेब विभुते, सहसचिव गणेश गोपने, खजिनदार दयानंद स्वामी, सहखजिनदार राजू पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तद्नंतर शालेय विद्यार्थ्यांना टी-शर्ट देऊन व खाऊ वाटप करून फोटोग्राफर बंधूंच्या वतीने पाल्यांचा आत्मविश्वास वाढवणे व शाबासकीची थाप देण्याच्या दृष्टीने शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. अध्यक्ष भाषणामध्ये रामदास गरगडे यांनी फोटोग्राफर बंधूंसाठी नवीन योजना यांची माहिती व आरोग्य विमाची माहिती देण्यात आली. निवड झालेल्या सर्व पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment