जयहिंद विद्यालयात 'पोलीस काका पोलीस दिदी' हा अभिनव उपक्रम संपन्न

कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथे दि.२० ऑगस्ट रोजी सकाळी विद्यालयात पोलिसांचा अभिनव उपक्रम पोलीस काका - पोलीस दिदी हा राबवण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात ही उस्मानाबाद जिल्ह्याचे सहाय्यक पोलिस अधीक्षक श्री. एम.रमेश यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आली.
यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना .जी. वाय.गुंजकर यांनी पोलिस काका पोलीस दिदी या उपक्रमाची थोडक्यात माहिती देताना पोलीस हे आपले मित्र आहेत हे सांगितले. महिला पोलिस प्रज्ञा जाधव यांनी विद्यार्थ्यांना गूड टच ब्याड टच याबद्दल माहिती दिली.
त्यानंतर ढोकी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.जगदीश राऊत साहेब यांनी विद्यार्थ्याच्या मनातील पोलिसांबद्दल ची भिती दूर करुन इलेक्ट्रॉनिक्स सायरन लॉक याबद्दल माहिती दिली.
यानंतर प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलिस अधीक्षक . एम.रमेश यांनी विद्यार्थ्याना पोलिसांचा अभिनव उपक्रम पोलीस काका पोलीस दिदी याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच गूड टच ब्याड टच याबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यानी जीवनात यशस्वी होण्यासाठी उच्च ध्येय ठेवून परिश्रम केले पाहिजे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एम.रमेश साहेबांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक.गवळी एस. के. हे होते . या कार्यक्रमासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक . एम. रमेश, सहाय्यक पोलिस निरीक्षक . जगदीश राऊत, . जी. वाय. गुंजकर (बीट अंमलदार),महिला पोलिस प्रज्ञा जाधव, पूजा स्वामी,पोलीस कॉन्स्टेबल महेश शिंदे , दत्ता ताटकर, शा. व्य. उपाध्यक्ष श्री.सुनील वळेकर, शिक्षणप्रेमी भागवत शिंदे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर ,कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार . ठाकरे पी.के.यांनी केले.
No comments:
Post a Comment