समविचाऱ्यांना कात्रज चा घाट दाखवत 'भीमा' परिवाराचे सोहाळे ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 5, 2022

समविचाऱ्यांना कात्रज चा घाट दाखवत 'भीमा' परिवाराचे सोहाळे ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व

 समविचाऱ्यांना कात्रज चा घाट दाखवत 'भीमा' परिवाराचे सोहाळे ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व

 सतीश जगताप यांचा ग्रामपंचायतीवर चौथ्यांदा झेंडा

सोहाळे (कटूसत्य वृत्त):- गेल्या अनेक महिन्यापासून लांबणीवर पडलेल्या सोहाळे ग्रामपंचायतची निवडणूक लागली आणि निकाल देखील, हाती आला. ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेमध्ये तालुक्यात एकमेव असल्याने सोहाळे ग्रामपंचायतीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. गावातील सर्व पक्षाचे, सर्व गटाचे आजी-माजी पदाधिकारी, गट प्रमुख, आजवरचे पॅनल प्रमुख  या सर्वांनी एकत्र येऊन केलेल्या समविचारी आघाडीशी भीमा परिवाराचे नेते तथा भीमा कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश जगताप यांनी एकेरी झुंज देत सर्व समविचाऱ्यांना कात्रजचा घाट दाखवत ग्रामपंचायतीवर ९-२ अशा मोठ्या फरकाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत चौथ्यांदा झेंडा फडकविला आहे. 


 सोहाळे ग्रामपंचायतीसाठी काल दि.४ ऑगस्ट रोजी ८७ टक्के इतके मतदान पार पडले. या झालेल्या निवडणुकीत समविचारी आघाडीकडून माजी पं. स. सभापती दिलीप पाटील, माजी सरपंच तुकाराम जगताप, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष माऊली जगताप, काँग्रेसचे नेते बबन जगताप, अर्जुन जगताप व अंकुश जगताप या सर्वांनी एकत्रित येऊन बलाढ्य असा लढा दिला. त्यामुळे एकेरी झुंज लढविणाऱ्या भीमा परिवाराला अर्थात सतीश जगताप यांना ही निवडणूक अवघड असल्याची चर्चा पंचक्रोशीत होती. शिवाय सतीश जगताप यांचे भीमा परिवारात 'पाणी' कमी व्हावे यासाठी आसपासच्या गावावरून देखील फिल्डिंग लावण्यात आली होती. मात्र गावातील सर्व युवकांना व बुजुर्गाना सोबत घेऊन पदवीधर व सुशिक्षित असलेल्या मुलगा 'ऋषी' याला सरपंच पदाचा चेहरा म्हणून पुढे आणून सतीश जगताप यांनी गावकऱ्यांच्या मनात स्थान निर्माण केले. त्यामुळे संपूर्ण गाव एकीकडे आणि मतदार एकीकडे असल्याचे चित्र पहावयास मिळाले. ऋषी जगताप यांने देखील प्रचाराचे नेटके नियोजन लावून घरोघरी जात प्रचार यंत्रणा राबवली. त्यामुळे गावकऱ्यांनी प्रभाग क्र.३ वगळता प्रभाग क्र.१, २ व ४ मध्ये भीमा परिवाराला कौल दिला.


- दरम्यान निकाल जाहीर झाल्यानंतर कारखाना स्थळी येऊन स्व. भीमराव दादा महाडिक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले. त्यानंतर कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, प्रवक्ते पांडुरंग ताटे, संचालक गणपत पुदे, बापू जाधव, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण  या सर्वांनी ठिकठिकाणी सर्वांचे जंगी स्वागत करून सत्कार केला. त्यानंतर सोहाळे येथे जंगी मिरवणूक काढून सांगता करण्यात आली.


- गावातील सर्व विरोधक एकत्रित झाले असताना सर्व गावकऱ्यांनी आणि सुज्ञ मतदारांनी आमच्या गटाला स्वीकारले ही कौतुकाची व अभिमानाची बाब आहे. येणाऱ्या काळात विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी खासदार धनंजय महाडिक, सभापती विजयराज डोंगरे, युवा नेते विश्वराज महाडिक या सर्वांच्या प्रेरणेने आणि व्हाईस चेअरमन सतीश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कष्ट आणि मेहनत घेऊन जिल्ह्यात सोहाळे गावाची मान अभिमानाने उंचावेल असे काम करणार आणि गावकऱ्यांनी दिलेल्या कौलाचा विश्वास सार्थकी ठरवणार.


विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते

▪️ प्रभाग क्रमांक १

- श्रीमंत देवाप्पा कांबळे - ३९४

- बाळासाहेब नवनाथ नाईकनवरे - ३८६

- विजया अर्जुन जगताप - ३८५


▪️प्रभाग क्रमांक २

- ऋषिकेश सतीश जगताप - ४९७

- विद्या चंद्रकांत बचुटे - ४८५

- नकुशा संजय बाबर - ४८०


 ▪️प्रभाग क्रमांक ३ (समविचारी गट)

- अंकुश भागवत जगताप - २३५

- छाया सारंग गौडदाब - २५२


▪️ प्रभाग क्रमांक ४

- धर्मराज सिद्राम सोनवणे - २३५

- माया ईश्वर गौडदाब - २३४

- अनुसया किरण पवार - २४०

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages