माढा विधानसभा मतदारसंघात भाजपची बुथ रचना सक्षम करा- धैर्यशील मोहिते पाटील
अकलूज (कटूसत्य वृत्त):- माढा विधानसभा मतदारसंघात भाजपची बूथ रचना सक्षम करा असे आवाहन भाजपचे संघटन सरचिटणीस धैर्यशिल मोहिते पाटील यांनी केले. कुर्डूवाडी येथे माढा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस व माढा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी मंडल अध्यक्ष योगेश बाबाराजे बोबडे , भाजप नेते भारतनाना पाटील,
युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष उमेश पाटील, तालुका संघटन सरचिटणीस जयसिंग ढवळे, व्यापारी आघाडीचे सुभाष शहा उपस्थित होते.
पुढे बोलताना सोलापूर जिल्हा संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माढा लोकसभा व माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये बूथ सशक्तीकरण अभियान संपूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण ताकतनीशी राबविण्यात यावे ज्या बुधवर आपल्याला मतदान कमी झाले आहे ते का व त्याची कारणे शोधून त्या बुथवर काम करायचे आहे. 2024 च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदार मोठ्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी व विधानसभेला भाजपचा झेंडा फडकण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी माढा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे यांनी विस्तृतपणे बूथ सशक्तिकरण अभियान काय आहे याची माहिती दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतामध्ये हे बुथ अभियान राबविले जात आहे ज्या संयोजकांना बुथ दिले आहेत त्यांनी प्रवास करून त्या गावातील प्रमुख पदाधिकारी, प्रमुख नेते, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख यांच्याशी बैठक करून त्या गावातील संपूर्ण माहिती घेऊन प्रत्येक घरामध्ये जाऊन भारतीय जनता पक्षाने केलेले काम केंद्र व राज्य सरकारने ज्या योजना राबवल्या आहेत तसेच मतदार संघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या कामाची संपूर्ण माहिती घरोघरी जाऊन द्यावी तसेच केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींच्या भेटी घेऊन त्यांना पक्षाशी कशा पद्धतीने जोडता येईल त्या पद्धतीने प्रयत्न करावा तसेच बुथ अध्यक्ष यांना मेरा बुथ सबसे मजबूत हर बुथ भाजप युक्त चा नारा देत भारतीय जनता पक्षाची ताकद माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये ताकतीने वाढवण्याची विनंती केली. यावेळी मंडलाध्यक्ष योगेश बाबाराजे बोबडे यांनी हर घर तिरंगा योजने संदर्भात माहिती देऊन माढा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक घरातील लोकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा भारताच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये तसेच ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांचेही स्मरण यानिमित्त व्हावे असे आव्हान केले. यावेळी विस्तारक शरद झेंडे, तालुका सरचिटणीस दत्तात्रय मोरे, जयसिंग आप्पा ढवळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा संध्या कुंभेजकर ओबीसी तालुकाध्यक्ष निवृत्ती तांबवे, युवा मोर्चा सरचिटणीस गिरीश ताबे व सर्व तालुका पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक दत्तात्रेय मोरे यांनी केले तर आभार युवा मोर्चाचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी मानले.

No comments:
Post a Comment