विष मुक्त किचन करण्याचा संदीप कापसे यांचा ध्यास - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 5, 2022

विष मुक्त किचन करण्याचा संदीप कापसे यांचा ध्यास

 विष मुक्त किचन करण्याचा संदीप कापसे यांचा ध्यास                 

रहस्य ऑरगॅनिक्सच्या दुसऱ्या शाखेचे अकलूज येथे होणार थाटात  सोहळा                      



अकलूज (कटूसत्य वृत्त):- विष मुक्त किचन करण्याचा ध्यास असल्याचे रहस्य ग्रुपचे संस्थापक संचालक संदीप कापसे यांनी अकलूज येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी अकलूज टीमचे महेश ओवाळ, सीमा काटकर उपस्थित होते.

 पुढे बोलताना कापसे म्हणाले रहस्यच्या माध्यमातुन 

माढा येथील रहस्य ऑइल लाकडी घाणा तेल कंपनीच्या दुसऱ्या शाखेचे उदघाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते अकलूज येथे दिनांक ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता क्रीडा संकुल शेजारी होणार आहे.या प्रसंगी प्रमोद कुदळे, सतीश कचरे, जगदीश निंबाळकर, अरुण सुगावकर,मा.श्री. सचिन दादा नरवडे, डॉ. नितीन गाडे, डॉ. हर्षवर्धन गायकवाड, डॉ. सुरेश सूर्यवंशी,डॉ. हरी झंजे,यांच्या प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

अकलूज शहरातील रहस्य ऑरगॅनिक्सचे फ्रँचायझी मॉडेल  महेश ओवाळ व सीमा काटकर हे चालवणार आहेत व पुढे जाऊन आसपासच्या वेगवगळ्या शहरात रहस्य ऑरगॅनिक्सच्या शाखा चालू होतील अशी माहिती रहस्य ऑरगॅनिक्सच्या टीमने दिली. 

रहस्य ऑइल लाकडी घाना तेल यांचा कारखाना माढा येथे असून त्यांचे रहस्य ऑरगॅनिक्सचे पहिले आउटलेट अवंती नगर येथे आहे.  या शॉप मध्ये लाकडी घाण्यावर काढलेले तेल, सेंद्रिय गूळ, गूळ काकवी, सैंधव मीठ, गावरान मध, गीर गायीचे तूप,डंकावर कुटलेले काळे तिखट, लाल तिखट, शेंगदाणा चटणी, जवस चटणी त्यासोबतच विविध फळांचे जाम, ड्रायफ्रूट, भीमसेन कापूर, सेंद्रिय शेतातून बनवलेली शेवगा पावडर, कडीपत्ता पावडर, गवती चहा उपलब्ध असणार आहे.

अभियांत्रिकी शिक्षण घेतल्यानंतर  संदीप कापसे यांनी नोकरी सोडून कोरोनाच्या काळात रहस्य ऑइल लाकडी घाना तेल उद्योगाच्या माध्यमातून २ वर्षात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्राचीन आयुर्वेदात लाकडी घाण्याला महत्व असल्याचे त्यांची बहीण डॉ विशाखा कापसे यांनी त्यांना सांगितले व त्यामुळे विषमुक्त किचन करण्याचा ध्यास घेऊन रहस्य ऑइलची निर्मिती झाली असल्याचे कापसे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages