जवळजवळ २० वेळा बोलूनही शिंदेसरकारला मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहुर्त मिळेना - महेश तपासे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 6, 2022

जवळजवळ २० वेळा बोलूनही शिंदेसरकारला मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहुर्त मिळेना - महेश तपासे

जवळजवळ २० वेळा बोलूनही शिंदेसरकारला मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहुर्त मिळेना - महेश तपासे

अडचणीत सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करा...

                  मुंबई (नासिकेत पानसरे):- मंत्रीमंडळाचा विस्तार करणार असे जवळजवळ २० वेळा बोलूनही शिंदेसरकारला मुहुर्त मिळेना आणि आजचाही मुहुर्त टळला आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे. 

                  राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केलेली नाही शिवाय शेतीचे सरकारकडून अद्याप पंचनामे पूर्ण केलेले नाही. द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला असताना मंत्रीमंडळाचा विस्तारही होईना ही दुर्दैवी बाब आहे असेही महेश तपासे म्हणाले. 

                  हे शिंदे सरकार संविधानिक आहे की नाही याबाबत सुप्रीम कोर्टात दावे - प्रतिदावे सुरू आहेत. तिकडे सगळा वेळ दोघांच्या सरकारला द्यावा लागतो आहे मात्र राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे त्याला मदत किंवा दिलासा द्यायला वेळ नाही असा आरोप करतानाच शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages