एटीएम मशीन फोडणारे दोन आरोपी गजाआड ; डी बी पथकाची कारवाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 2, 2022

एटीएम मशीन फोडणारे दोन आरोपी गजाआड ; डी बी पथकाची कारवाई

एटीएम मशीन फोडणारे दोन आरोपी गजाआड ; डी बी पथकाची कारवाई

                   मोहोळ (कटूसत्य वृत्त):- गेली काही दिवसापासून मोहोळ शहरातील सर्व एटीएम फोडण्याच्या घटना घडत आहेत.  त्यामध्ये मोहोळ शहरातील कुरूल रोड लगत असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या मोहोळ ते कुरूल रस्त्यावरील मुख्य चौकातील ए.टी.एम.ची मशीन दगडाने फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात मोहोळ पोलिसांना यश आले आहे .

                   याबाबत अधिक माहिती अशी की शनिवार दि ३० जुलै रोजी पहाटे ३ वाच्या सुमारास मोहोळ शहरातील कुरूल रोडला असलेले एस.बी.आय ए.टी.एम अज्ञात व्यक्तीने फोडण्याचा प्रयत्न केला होता.त्याबाबत मोहोळ पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन सदर गुन्हयाचे तपासाच्या अनुशंगाने मोहोळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस पथक हे पोलीस अधीक्षक अमोल भारतीपोलीस निरीक्षक अशोक सायकल यांच्या मार्गदर्शनाखाली सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे तपास घेणे माहीती काढणे मोबाईलच्या माध्यमातुन चालू होते अशातच सदर आरोपींची गोपनीय माहीती मिळाली की फुटेज मधील असनारे आरोपीसारखे दिसनारे संशईत इसम हे सौंदणे तालुका मोहोळ येथे असल्याची माहिती मिळाल्याने या पथकाने सौंदणे येथील आरोपी १)पांडुरंग शिवाजी डुणे २)गणेश सुरेश अनुभुले हे राहणार सौंदणे तालुका मोहोळ या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सुरुवातीला आरोपींनी उडवा उडवीची उत्तरे दिली त्यावेळी त्यांना विश्वास घेऊन चौकशी असता त्यांनी गुन्हा केला असल्याचे कबूल केले आहे. त्यांच्या ताब्यातुन दोन चोरीकेलेल्या मोटर सायकली ही हस्तगत केल्या तसेच त्यांचेकडून अणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

                   सदरची कारवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपूते अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक सायकर व गुन्हे शाखेचे पो.हे. कॉ. शरद ढावरे , पोकॉ. पांडुरंग जगताप , हरीश थोरात यांनी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक खारगे करित आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages