बागलवस्ती-बारलोणी येथे स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा; माजी सैनिकाचे हस्ते ध्वजारोहण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 17, 2022

बागलवस्ती-बारलोणी येथे स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा; माजी सैनिकाचे हस्ते ध्वजारोहण

बागलवस्ती-बारलोणी येथे स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा; माजी सैनिकाचे हस्ते ध्वजारोहण

क्रीडा साहित्याचे वाटप; महिलांच्या हस्ते वृक्षारोपण

               बेंबळे (कटूसत्य वृत्त):- बारलोणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागलवस्ती येथे  मोठ्या उत्साहात माजी सैनिक  हरिदास बागल यांच्या हस्ते  ध्वजारोहण करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात कल्याणी बागल,विराज घोडके, शौर्य बागल या विद्यार्थ्यांनी केलेल्या भाषणाचे उपस्थित ग्रामस्थांनी कौतुक केले. याप्रसंगी माजी सैनिक हरिदास बागल व  सेवानिवृत्त आदर्श शिक्षक नागनाथ जाधव यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश बागल, विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन सुनील बागल, प्रभाकर गोरे, ,बाळासाहेब बागल, राजाभाऊ बागल, संतोष बागल, प्रभाकर बागल, प्रशांत बागल,शिवराज बागल व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

               अंगणवाडी व प्राथमिक शाळेकरीता ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आलेल्या  झोका व इतर क्रिडा साहित्याचे उद्घाटन विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे संचालक सुरेश बापू बागल यांच्या हस्ते करून ते साहित्य विद्यार्थांना खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना  शशिकांत गोरे, श्रीकांत गोरे,संदेश बागल यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. . वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले., तसेच महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक नागनाथ जाधव,सुनील बागल, रेल्वे कर्मचारी आकाश गोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक निलेश देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन सुजाता वाघ यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages