आदर्श स्कूल मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 17, 2022

आदर्श स्कूल मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

आदर्श स्कूल मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

                    कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- आदिशक्ती शिक्षण संस्था वेताळवाडी संचलित आदर्श पब्लिक स्कूल व ज्युनिअर सायन्स कॉलेज कुर्डूवाडी या ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी दि.१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या पालकांसमवेत"हर घर तिरंगा" उपक्रमास भरघोस प्रतिसाद दिला.

                    प्रशालेमध्ये सेवानिवृत्त सैनिक मेजर संजय दिवे व मेजर सचिन वाघमारे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.मेजर संजय दिवे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्या नंतर 

                    निवडक विद्यार्थ्यांचे संचलन घेण्यात आले.विद्यार्थी मनोगतामध्ये  विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे महत्त्व विशद केले.

                    या शैक्षणिक वर्षामध्ये हाऊस सिस्टीमच्या माध्यमातून मतदान घेऊन जे विद्यार्थी प्रतिनिधी निवडले गेले-हेड बॉय,हेड गर्ल,स्पोर्ट हेड,कल्चरल हेड,हाऊस कॅप्टन,व्हाईस कॅप्टन,प्रीफेक्ट या विद्यार्थ्यांचा पदग्रहण सोहळा प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला.माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल सुरवसे यांनी आपल्या मनोगतातून देशप्रेम व स्वातंत्र्यवीरांना आदरांजली व्यक्त केली व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. 

                    सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालनझ वाघमारे यांनी केले. यासाठी संस्थेच्या प्रकल्प संचालिका सौ. पूजा सुरवसे,संचालक मोहन सुरवसे,संचालिका सौ.आशाताई सुरवसे,वर्षाताई सुरवसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

                    यासाठी प्रकल्प संचालिका पूजा सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका शकीलाबी सय्यद, प्राथमिक विभाग प्रमुख आयशा मुलाणी,सीबीएसई विभाग प्रमुख लोंढे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages