दत्त प्राथमिक विद्यामंदिर व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न
सोलापूर : दि:-१५/०८/२०२२ वार सोमवार रोजी दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी व दत्त प्राथमिक विद्यामंदिर बार्शी या दोन्ही शाळेत ७५वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री.छत्रपती क्रीडा,शिक्षण व समाजसेवी संस्था,उपळाई(ठोंगे) या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.मोहन (आण्णा) ठोंगे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राजेशजी चांगभले (माजी सैनिक व उद्योजक) प्रमुख उपस्थिती म्हणून सचिवा सौ.तेजस्विताई ठोंगे,कु.मृदुला ठोंगे , श्री.छगन जगताप, श्री. सुधाकर चेचे आदर्श शिक्षक श्री.सादिक बागवान (मुख्या. दत्त प्राथमिक) श्री.चंद्रकांत लोखंडे (मुख्या. दिलीपराव सोपल प्रशाला)श्री.चंदरराव जगदाळे(गुरुजी),श्री. जयसिंगराव पाटील (गुरुजी) पालक श्री.माणिक पवार,श्री.सुनिल पाटील श्री.कुंडलिक पुजारी उपस्थित होते
मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुणा मठपती यांनी केले इयत्ता १ली ते १० वी मधील विद्यार्थ्यांनी सुंदर रित्या आपले विचार भाषणातून व्यक्त केले सदर कार्यक्रमास माजी सैनिकांना बोलावून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .सैनिकाप्रति विद्यार्थ्यांमध्ये आदर भाव निर्माण करण्यात शाळेला यश मिळाले.त्यांनी त्यांच्या मनोगतातून सैनिक कोणत्या परिस्थितीत देशाचे रक्षण करतात यांची उदा.विद्यार्थ्यांसमोर मांडली.संस्थेचे संस्थापक श्री.मोहन ठोंगे यांनी शाळेतील शिक्षक सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून त्यांच्या कडून दिल्या जाणाऱ्या ज्ञानाचा विध्यार्थ्यांनी उपयोग करून यशस्वी व्हावे व शाळेचे नाव उज्वल करावे असे मत मांडले शिक्षक प्रतिनिधी म्हणून सौ.विवेका मते मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले
हर घर तिरंगा,प्रभात फेरी,माजी सैनिक मार्गदर्शन,राष्ट्रभक्तीपर गीत गायन,स्वच्छता मोहीम,शिक्षक पालक-माता पालक मेळावा आयोजन,गावचा इतिहास,मोबाईल चे दुष्परिणाम, अर्थ साक्षरता,पर्यावरण संवर्धन शपथ,सामूहिक राष्ट्र गीत गायन,देशभक्तीपर गीत गायन,किशोरी मेळावा ,वृक्षारोपण,विद्यार्थ्यांच्या निबंधलेखन, रंगभरण, रांगोळी,चित्रकला स्पर्धा घेऊन मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले अशाप्रकारे शासन परिपत्रकाप्रमाणे विविध उपक्रम घेऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.चंद्रकांत लोखंडे(मुख्या.),श्री.सादिक बागवान(मुख्या.), श्री.युवराज जगताप ,श्री.सुनिल लंगोटे , श्री.मंगेश मोरे ,श्री.श्रीकांत कुंभारे ,श्री.सचिन काळे ,श्री.राहुल ठोंगे ,श्री.संतोष ठोंबरे,अरुणा मठपती मॅडम,सौ.शितल पाटील मॅडम ,श्रीम.संगीता काळे मॅडम,सौ.विवेका मते मॅडम व सेवक श्री.संदीप भोरे यांनी प्रयत्न केले.
सुंदर फलक लेखन श्री.युवराज जगताप सर ,सूत्रसंचालन सुनिल लंगोटे सर तर आभार श्री.मंगेश मोरे यांनी मानले.
No comments:
Post a Comment