नितीन पोतदार यांना राष्ट्रपती पुरस्कार घोषित... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 17, 2022

नितीन पोतदार यांना राष्ट्रपती पुरस्कार घोषित...

नितीन पोतदार यांना राष्ट्रपती पुरस्कार घोषित...

                 बेंबळे (कटुसत्य वृत्त): माढा तालुक्यातील पिंपळखुटे गावचे सुपूत्र व मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोतदार यांना पोलीस दलातील वैशिष्ट्य पूर्ण कामगिरीबद्दल राष्ट्रपती पुरस्कार घोषीत झाला आहे

                 १९९५ मध्ये मुंबई पोलीस दलात दाखल झालेले पोतदार यांनी डी.बी मार्ग पोलीस स्टेशन, गुन्हे विशेष शाखा, आर्थिक गुन्हे शाखा , दहशतवाद विरोधी पथक इत्यादी ठिकाणी त्यांनी काम केले आहे. त्यांच्या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व उत्कृष्ट कार्याबद्दल आज पर्यन्त त्यांना ३१६ विविध पदके व पुरस्कारांचा मिळालेले आहेत ,. त्यामध्ये कमिशनर मेडल , डी जी मेडल , उत्कृष्ट तपास आधिकारी इत्यादी पुरस्काराचा समावेश आहे. सध्या ते मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखा या महात्वाच्या पदावर वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

                 राष्ट्रपती कायालयाने त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सेवेची दखल घेवून त्यांना या वर्षीचा राष्टपती पुरस्कार घोषीत केला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर ,राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अंतिरीक्त महासंचलक अतुलचंद्र कुलकर्णी(अरणकर) यांनी पोतदार यांचे अभिनंदन केले आहे . या बद्दल आ. संजयमामा शिंदे यांचे सह माढा तालुका व सोलापूर जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी पोतदार यांचे अभिनंदन केले आहे . ग्रामीण भागातील व्यक्तीला पोलीस खात्यातील उत्कृष्ट सेवेबद्दल मिळालेल्या राष्ट्रपती पुरस्काराबद्दल लवकरच त्यांचे मित्र मंडळी, हितचिंतक तसेच तालुका व जिल्ह्यातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नितीन पोतदार यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती ढवळस चे माजी सरपंच संतोष अनभुले यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages