८०० नव्हे ३९९ लोकोपयोगी निर्णय मुख्यमंत्री कार्यालयाचा खुलासा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 9, 2022

८०० नव्हे ३९९ लोकोपयोगी निर्णय मुख्यमंत्री कार्यालयाचा खुलासा

८०० नव्हे ३९९ लोकोपयोगी निर्णय  मुख्यमंत्री कार्यालयाचा खुलासा 

जनहिताचा वेगाने निर्णय...

              मुंबई, (नासिकेत पानसरे):- नव्याने सत्तेवर आलेल्या शिंदे - फडणवीस सरकारने ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा सपाटा लावतानाच आपल्या सोयीचे नव्याने ८०० नवे निर्णय घेतल्याची टीका शिवसेनेकडून होत आहे.नवीन सरकारने कार्यभार स्वीकारल्यापासून ते आजतागायत जनहिताचे विविध निर्णय झपाट्याने घेतले आहेत. १ जुलै ते अगदी आजपर्यंत म्हणजे आठ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३९९ फाईल्सचा निपटारा केला असल्याचा खुलासा  मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आला. यात यात नैसर्गिक आपत्ती मधील मदत, गरजूंना मदत,कृषि विभाग, मंत्री मंडळासमोर आणावयाचे प्रस्ताव,फाईल्स, विविध नवीन शासकीय नियुक्त्या, सरळ सेवा भरती,वन विभाग,सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण अशा विविध विभागाच्या फाईल्सचा समावेश असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने कळविले आहे.

              मुख्यमंत्र्यांनी आपल्या पहिल्याच बैठकीत विविध विभागाच्या सचिवांना सर्वसामान्यांची तसेच जनहिताची कामे गतिमान रीतीने झाली पाहिजेत तसेच लोकांची कामे अडणार नाहीत हे पाहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जनहितासाठी तत्परतेने निर्णय घेण्यात आल्याचे या कार्यालयाने कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages