जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगोलकर-गवळी वस्ती (तरंगेवाडी) शाळेची शैक्षणिक, श्रावण सहल मोठ्या उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 9, 2022

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगोलकर-गवळी वस्ती (तरंगेवाडी) शाळेची शैक्षणिक, श्रावण सहल मोठ्या उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगोलकर-गवळी वस्ती (तरंगेवाडी) शाळेची शैक्षणिक, श्रावण सहल मोठ्या उत्साहात संपन्न

                  सांगोला (कटुसत्य वृत्त): ७ ऑगस्ट २०२२.रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगोलकर-गवळी वस्ती (तरंगेवाडी) शाळेची शैक्षणिक, श्रावण सहल मोठ्या उत्साहात संपन्न झाली. प्रथमतः गुरुकृपा ट्रॅव्हलचे पालकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुखमय प्रवासाच्या शुभेच्छा देऊन सहलीस सुरुवात झाली. प्रथमतः श्री. बिरोबा देवस्थान आरेवाडी (बन) येथे सर्वांनी श्री. बिरोबाचे दर्शन घेतले. तद्नंतर सामुहिक भोजनाच्या सर्वांनी आस्वाद घेऊन सहल पुढील पर्यटन स्थळाकडे रवाना झाली. तद्नंतर रायेवाडी येथील उभा महादेवाचे दर्शन घेऊन सहल पुढे रवाना झाली. नंतर श्री. राधा-कृष्ण (गोपाल) मंदिर आरवडे ता. तासगांव येथील श्री. राधा - कृष्णाचे दर्शन घेऊन सर्वांनी श्रावण सरीचा आनंद घेतला. सर्व बालचमूने येथील बगीच्यामध्ये मनमुराद खेळण्याचा आनंद घेतला. येथील रम्य परिसर, बाग-बगीचा, गो-शाळा, संग्रहालयातील विविध गोष्टी पाहिल्या. तद्नंतर सहल पुढे रवाना झाली. शुकाचार्य(क. महांकाळ) येथील श्री. शुकाचार्यांचे दर्शन घेऊन सर्वांनी अल्पोपाहार घेऊन पुढे ऐतिहासिक ठिकाण बानुरगड येथील बहिर्जी नाईक यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages