उजनी धरणातील गाळ काढण्याचा राज्य सरकारचा निर्णय...

उच्चस्तरीय समितीची स्थापना...
५० ते ६० हजार मेट्रिक टन गाळ निघणार...
15 ते 18 टीएमसी पाणीसाठा वाढणार...
राज्यातील गिरणा ,गोसेखुर्द ,जायकवाडी व मुळा या धरणांतीलही गाळ काढणार...
बेंबळे (कटुसत्य वृत्त): सोलापूर जिल्ह्याची भाग्य वरदाईनी असणाऱ्या उजनी धरणात साठलेल्या प्रचंड गाळामुळे उपयुक्त पाणीसाठ्यात मोठी घट झाली असून तो गाळ काढल्यास पाणीसाठ्यात मोठी वाढ होणार असून तो गाळ काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे ,त्याकरता मागवण्यात आलेल्या निवेदक कागदपत्राचे मानक प्रारूप तयार करण्यासाठी राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे व या समितीला दोन महिन्यांत अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले असून त्यानंतर गाळ काढण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी झालेल्या अभ्यासपूर्ण माहितीनुसार उजनी धरणामध्ये ५० ते ६० हजार मेट्रिक टन गाळ साठलेला असण्याची शक्यता असून हा गाळ बाहेर काढल्यानंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये किमान 15 ते 18 टीएमसी पाणी साठा निश्चित वाढेल असे महाराष्ट्र राज्य जलसंपदा तांत्रिक विभागातील अनेक अभ्यासू वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सोलापूर जिल्ह्यातील उजनी, नाशिक जिल्ह्यातील गिरणा, भंडारा जिल्ह्यातील गोसे खुर्द, औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी व नगर जिल्ह्यातील मुळा या पाच धरणातील गाळ काढण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या कार्यकाळात सन 2018 मध्ये घेण्यात आला होता, त्यानुसार मागवण्यात आलेल्या निविदा कागदपत्रात संदिग्धता आणि अंतर्विरोध असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे निविदा प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. सध्या राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे गट व भाजपा सरकार आले असून पुन्हा देवेंद्र फडणवीस उपमुख्य झाल्यानंतर या पाच धरणातील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .या कामासाठी मागणीच्या निविदा च्या सुधारित मानक स्वरूप तयार करण्यासाठी स्थापन समिती स्थापन करण्यात आली असुन नाशिक येथील मेरी चे महासंचालक रा. रा .शहा यांच्या अध्यक्षतेखाली इतर चार जण समितीत असून नाशिक येथील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉक्टर सं.म. बेलसरे ,जलविद्युत स्थापत्य गुणनियंत्रण चे मुख्य अभियंता सं .रा. तिरमनवार, पुणे विभागाचे अध्यक्ष अभियंता सं.द चोपडे हे सदस्य असणार आहेत,तर पुणे पाटबंधारे प्रकल्प महामंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
अहवालात प्रारुप ई-निविदा कागदपत्राचा तसेच सुधारणांचा तपशीलाचा अहवाल या समीतीने दोन महिन्यात शासनाला सादर करण्याचा आहे व या वादात प्रारूप ई निविदा कागदपत्राचा तसेच तयार करण्यात आलेल्या सुधारणा चा तपशील देण्यात येणार आहे.
समितीकडून गाळ काढण्याच्या कामाची निविदा कागदपत्र तयार करण्यात येतील याबाबत महसूल आणि पर्यावरण विभागासह ड्रेसिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि केंद्रीय जल आयोग यांच्याशी आवश्यकता भासल्यास चर्चा करण्यास मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अध्यक्ष अभियंता आणि समितीचे सदस्य सचिव प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील शेतकरी या दृष्टीने अत्यंत स्वागतार्ह निर्णय शिंदे - फडवणीस सरकारने घेतला असून या पाणी वाढीचा खूप मोठा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. जिल्ह्यातील ज्या भागाला सध्या पाणी मिळाले नाही त्या भागातील शेतकऱ्यांना वाढलेल्या पाण्याचा उपयोग होईल, परंतु उजनी धरणाचे पाणी बारामती व इंदापूर या भागात पळविण्याचा जो निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता व त्या उपसा सिंचन योजनेसाठी निधीची तरतूद केली केली होती तो सोलापूर जिल्ह्यावर अन्यायकारक असणारा निर्णय तात्काळ रद्द करून शेतकऱ्याला न्याय द्यावा यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना आम्ही शिष्टमंडळासह भेटणार आहोत. - प्राध्यापक सुहास पाटील
रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा प्रमुख व उजनी धरण बचाव समिती सदस्य
समितीने आपला अहवाल दोन महिन्यात राज्य शासनाला सादर करायचा आहे .या अहवालात प्रारुप ई-निविदा कागदपत्राचा तसेच करण्यात आलेल्या सुधारणांचा तपशील देण्यात येणार आहे. समितीकडून गाळ काढण्याच्या कामाची मानक निविदाकाल पत्रे तयार करण्यात येतील. याबाबत महसूल आणि परिवार विभागासह ड्रेसिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि केंद्रीय जल विभाग यांच्याशी आवश्यकता भासल्यास चर्चा करण्यास मान्यता देण्यात आली आहे .
प्रवीण कोल्हे, अधीक्षक अभियंता पुणे पाटबंधारे प्रकल्प व मंडळ सचिव समिती सदस्य.
No comments:
Post a Comment