शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी माती व पाणी परीक्षण करणे आवश्यक - अपूर्वा गोसावी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 9, 2022

शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी माती व पाणी परीक्षण करणे आवश्यक - अपूर्वा गोसावी

 शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी माती व पाणी परीक्षण करणे आवश्यक - अपूर्वा गोसावी

कळमण येथे लोकमंगल कृषी महाविद्यालयाकडून शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर

                माढा (कटूसत्य वृत्त):- अनेक शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खते,औषधे व कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात तरीही अपेक्षित उत्पादन मिळत नाही त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील माती व पाणी परीक्षण करून आवश्यकतेनुसार विविध प्रकारच्या खतांचा वापर केल्यास निश्चितच उत्पादन वाढण्यास मदत होते असे प्रतिपादन माढा तालुक्यातील निमगाव (टें) येथील कृषीकन्या अपूर्वा गोसावी हिने केले आहे.

                त्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत,वडाळा येथील लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित कळमण येथील शिबिरात शेतकरी व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

                पुढे बोलताना कृषीकन्या अपूर्वा गोसावी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी जमिनीचा कस व पोत टिकवून ठेवण्यासाठी जमिनीची वेळोवेळी खोलवर नांगरट आणि मशागत करावी.गरजेनुसार ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. माती व पाणी परीक्षण केल्यास अनावश्यक खर्च टाळता येतो.नगदी पिकांबरोबरच गरजेनुसार खाद्य पिकांचेही उत्पादन घ्यावे.विविध रोगांचे नियंत्रण व व्यवस्थापन कसे करावे याविषयी माहिती दिली.

                यावेळी कृषीकन्या प्रियांका दुरे, पूजा मोरे,भाग्यश्री कुमावत,शिवानी सहारे यांनीही शेतकऱ्यांना माहिती देऊन मार्गदर्शन केले. प्राचार्य सचिन फुगे, प्रा. कृष्णा टिंगरे, प्रा.प्रज्ञा कुंदळे, डॉ. दळवी यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages