साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुनिल चव्हाण
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- साने गूरुजी शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुनिल चव्हाण यांची तर सचीन चौधरी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणुक निर्णय अधिकारी राजु ढोणे यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची बैठक पतसंस्थेच्या कार्यालयात पार पडली. या बैठचीत ही निवड करण्यात आली.यावेळी संचालक आप्पाराव इटेकर,विरभद्र यादवाड,भिमराया कापसे,मुरलीधर कडलासकर,विनोद आगलावे,जयंत गायकवाड,भाऊसाहेब मोरे,उल्हास बिराजदार,शिवानंद हिरेमठ,धनाजी मोरे,महादेवी पाटील,फरजाना मरतुरे आदी उपस्थित होते.या निवडीबद्दल रमेश चौगुले,नागनाथ सुरवसे,महेश सरवदे,सोमेश्वर याबाजी, अनिल गायकवाड व अ. गफुर अरब यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment