कुर्डूवाडीत आदिवासी दिन उत्साहात साजरा.! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 9, 2022

कुर्डूवाडीत आदिवासी दिन उत्साहात साजरा.!

कुर्डूवाडीत आदिवासी दिन उत्साहात साजरा.!

                  कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- जागतिक आदिवासी दिन पारधी समाज विकास संघाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आला.यावेळी आदिवासी समाजातील क्रांतिवीर समशेरसिंह पारधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.प्रारंभी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तोफांची सलामी देण्यात आली. 

                  कुर्डूवाडी शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी चौकामध्ये जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून जलोष करण्यात आला.यावेळी पारधी सामाज्याचा वतीने शहरातील सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात येऊन जागतिक आदिवासी दिना निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी  महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

                  या कार्यक्रमाचे अध्यक्ष पारधी समाज संघटनेचे अध्यक्ष सतीश भोसले,रवी भोसले,अक्षय भोसले, बबन काळे,तानाजी शिंदे,आविदा भोसले,काळे,अरविंद,काळे,काका भोसले,समाधान पवार,अनिल भोसले,बबलू काळे,अविनाश शिंदे, सीमा शिंदे आदिसह पारधी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages