तहानलेल्या जनतेला मृगजळ दाखविले जाते - रोहन सुरवसे पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 9, 2022

तहानलेल्या जनतेला मृगजळ दाखविले जाते - रोहन सुरवसे पाटील

तहानलेल्या जनतेला मृगजळ दाखविले जाते - रोहन सुरवसे पाटील

                  पुणे (कटूसत्य वृत्त):- गेली पाच सहा वर्षे झाली आपली जनता अच्छे दीनचे चातका प्रमाणे वाट पाहत असून तहानलेल्या जनतेला मृगजळ दाखविले जात असल्याचा घणाघात स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस महाराष्ट्र राज्य रोहन सुरवसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केला.

                  रोजची वाढती महागाई आणि गोरगरिबांचे चाललेले हाल  याबद्दल प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना रोहन सुरवसे पाटील गरजले.पुढे बोलताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले की कोरोना सारखा महाभयानक रोग माणसाच्या आयुष्यात चक्री वादळा साररखा आला आणि बरच काही उध्वस्त करून गेला.हातचे कामे गेली. जीवाभावाची माणस गेली. जवळचे दोन पैसै गेले. उधारी वाढली. व्याजाने पैसे काढण्याची वेळ आली. डाळी कडधान्ये भाव वाढले.रोज पेट्रोल डिझेल दरवाढ होऊ लागली. घरगुती गॅस टाकीसाठी हजार रुपये मोजावे लागतात.भाजी पाला महाग होत आहे. दूग्ध जन्य पदार्थावर जीएसटी झाली. ज्याच्याकडे बक्कळ पैसाची नौकरी आहे. ज्याचेकडे रोजची उलाढाल आहे.ज्याच्या तिजोरीत दोन नंबरचा पैसा आहे. अशा लोकांना महागाईची काय किंमत कळणार आहे. महागाईचे खरे चटके गोरगरिबांना सोसावे लागत आहे.बदल हा काळाची गरज आहे. आणि ते जनतेच्या हातात आहे. जनतेचा हात मजबूत आहे.हातातल्या घड्याळात वेळ येईल तेव्हा महागाई विरुद्ध जनतेने  धनुष्यबाण उचलेला असेल यात शंका नाही असेही रोहन सुरवसे पाटील म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages