अकलूज येथे 86 कि.मी. च्या तिरंगा मोटार सायकल रॅलीचे आयोजन
.png)
अकलूज (कटूसत्य वृत्त):- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने अकलूज येथे दि 10 ऑगस्ट रोजी 86 कि.मी. च्या तिरंगा मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भारतीय स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव सोहळा समिती अकलूजचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
मोहिते-पाटील म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तिरंगा ध्वजास मानवंदना देण्यासाठी माळशिरस तालुक्यातील नागरिकांनी तिरंगा मोटार सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीमध्ये शिक्षण प्रसारक मंडळाचे 672, शिवरत्न शिक्षण संस्थेचे 192, श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्टचे 18, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे 250, अकलूज विविध कार्यकारी सोसायटीचे 7. अकलूज खरेदी विक्री संघाचे 5, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे 21 असे एकूण 1165 महिला व पुरूष सहभागी होणार आहेत. ही रैली प्रतापसिंह चौक, आझाद चौक, गांधी चौक, संग्रामनगर, माळशिरस, खुडूस विजयवाडी, विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलमार्गे सदुभाऊ चौक येथे येईल.
स.म. शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना, शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ, विजयसिंह मोहिते-पाटील सहकारी वाहतुक संघ, यशवंतनगर विविध कार्यकारी सोसायटी व इंजिनिअरींग कॉलेजची मोटारसायकल रॅली शंकरनगर, सदुभाऊ चौक, माळीनगर, 25/4, महाळूंग, श्रीपूर, बोरगांव, माळखांबी, बोंडले, वेळापूर, खंडाळी माळेवाडी सदुभाऊ चौक मार्गे शंकरनगर येथे येईल ही रैली 10 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता सुरू होईल.
या पत्रकार परिषदेस कार्याध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील, कार्याध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील अर्जुनसिंह मोहिते-पाटील, स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment