मुंबईतील आठ वर्ष न जुळलेल्या पायाच्या हाडावर डॉ. आडके यांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 9, 2022

मुंबईतील आठ वर्ष न जुळलेल्या पायाच्या हाडावर डॉ. आडके यांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबईतील आठ वर्ष न जुळलेल्या पायाच्या हाडावर डॉ. आडके यांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

                सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मुंबईतील आठ वर्ष न जुळलेल्या पायाच्या हाडावर रशियन एलीझारोव्ह पद्धतीने सोलापूरच्या डॉ. संदीप आडके यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून चार तासात केले चालते.

                सोलापूर: मुंबई मधील एका ५९ वर्षीय व्यवसायिकाच्या डाव्या पायाच्या नडगीच्या आठ वर्ष न जुळलेल्या व त्यावर तीन अयशस्वी शस्त्रक्रिया मुंबईत झाल्यानंतर, सोलापूरचे प्रसिद्ध अस्थिरोग व एलिझारोव्हतज्ञ डॉ.संदीप आडके यांनी ३१ तारखेला रशियन एलिझारोव्ह पद्धतीने यशस्वी शस्त्रक्रिया केली. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया झाल्यानंतर चार तासानंतर शस्त्रक्रिया केलेल्या पायावर या रुग्णास त्यांनी चालते केले.

                आठ वर्षांपूर्वी मुंबईतील एका व्यवसाईकाचे कार अपघातामध्ये डाव्या पायाच्या गुडघ्या खालील हाडात फ्रॅक्चर झाले होते. त्यानंतर मुंबईतच त्यास प्लेट बसवली होती, परंतु लगेचच त्यामध्ये पु भरल्यामुळे ती प्लेट बाहेर आली व ती काढून टाकण्यात आली व काही दिवसानंतर पुन्हा दुसरी प्लेट व बोनग्राफ्टिंग असे दुसरे ऑपरेशन केल्या गेले व कालांतराने ही प्लेट सुद्धा जंतुसंसर्ग होऊन जखम होऊन बाहेर आली व तिसऱ्यांदा ही प्लेट काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या आठ वर्षात तीन वेळा अयशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने हे हाड जुळल्या गेले नव्हते तसेच पाच सेंटीमीटर पायाची उंची कमी झालेली होती. अशा अत्यंत अवघड परिस्थितीत मुंबईतील कोणत्याही अस्थिरोगतज्ञाने यावर पुढील शस्त्रक्रिया करण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर सोलापूरच्या डॉ. संदीप आडके यांनी बोरिवलीतील श्रीकृष्ण मल्टीसुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन रशियन पद्धतीने बाहेरूनच तारा व रींगाची प्रेम लावून ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर चार तासात रुग्ण आपल्या शस्त्रक्रिया केलेल्या पायावर वाकरच्या साह्याने चालू लागला. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचे आठ वर्षांत न जुळलेले हाड जुळून येईल व पाच सेंटीमीटर छोटा झालेला पाय सुद्धा लांबवता येईल असे नियोजन केले आहे. पुढील चार ते सहा महिन्यांमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल व त्यानंतर ही रिंगची फ्रेम काढून टाकण्यात येईल.

                रशियन एलिझारोव्ह ही पद्धत जगातील अस्थिरोगांवरील अतिशय प्रगत पद्धती असून हिने तुटलेली हाडे, जखमा असलेली हाडे, न जुळलेले व वाकडी हाडे, कॉस्मेटिक उंची वाढवणे, लहान मुलांचे विविध अस्थिरोग, गुडघेदुखी, पोलिओ अशा ८०%  असाध्य अस्थिरोगांवर विनाचिरफाड व अतिशय प्रभावीपणे उपचार करता येतात. डॉ आडके यांनी  या पद्धतीचे प्रशिक्षण रशियातील रशियन एलिझारोव्ह सायंटिफिक सेंटर, कुरुगान येथे जाऊन घेतले आहे व त्यात ते आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रख्यात आहेत. मुंबईतील आठ वर्ष न चालता येणाऱ्या, सधन रुग्णास चार तासात सोलापुरातील अस्थिरोग तज्ञ चालवू शकतात ही सोलापूरच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages