शिवरत्न पॅटर्नचा यशराज गायकवाड याने राष्ट्रीय परीक्षेत यश संपादन केले
.png)
अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिवरत्न शिक्षण संस्था संचलित शिवरत्न पॅटर्न,अकलूज मधील विद्यार्थी कु.यशराज संतोष गायकवाड याने कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर (COA) ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाची स्वायत्त वैधानिक संस्था NATA (National Aptitude Test in Architecture) यांनी घेतलेल्या परीक्षेमध्ये 200 गुण पैकी 114 गुण मिळवून गव्हर्मेंट कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये प्रवेशासाठी पात्र झाला आहे.या यशाबद्दल संस्थेच्या उपाध्यक्ष शितलदेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते यशराज गायकवाड याचा गौरव करण्यात आला.
अकलूज व परीसरातील विद्यार्थीना गुणवत्तापूर्ण व उच्च दर्जाचे शिक्षण देणारी संस्था म्हणून "शिवरत्न पॅटर्नचा" उदय झालेला आहे. शिवरत्न पॅटर्नच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी NEET, JEE व इतर स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
यशराज संतोष गायकवाड याच्या या यशाबद्दल त्याचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक,प्रिन्सिपल,समन्वयक त्यांच्या पालकांचे शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशिल मोहिते-पाटील,उपाध्यक्षा तथा शिवरत्न पॅटर्नचे चेअरपर्सन शितलदेवी मोहिते-पाटील,सर्व संचालक मंडळ व्यवस्थापन सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment