लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाची शैक्षणिक भेट
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथे शैक्षणिक भेट दिली. कृषी विज्ञान केंद्र येथे डॉ . सुरज मिसाळ यांनी विद्यार्थ्यांना वर्मीकंपोस्ट निर्मिती, हवामान अंदाज याच्या बद्दल मार्गदर्शन केले ,तर काजल जाधव यांनी माती परीक्षणाबद्दल माहिती दिली व आपण शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून जास्तीत जास्त फायदा कशा प्रकारे करून देऊ शकतो यावर मार्गदर्शन केले. यासोबतच विद्यार्थ्यांनी यल्लमवाडी येथील सिद्धी बेदाणा केंद्र आणि सिद्धी कृषी सेवा केंद्र या ठिकाणी शैक्षणिक भेट दिली. सिद्धी बेदाणाचे मालक शुभम शिंदे यांनी विद्यार्थ्यांना बेदाण्याचे वेगवेगळे प्रकार , त्याची संपूर्ण प्रक्रिया , आर्थिक व्यवस्थापन कसे करावे आणि ग्रेडिट युनिट बद्दल परिपूर्ण माहिती दिली. तसेच त्यांच्या कृषी सेवा केंद्रामधील विविध बियाणे , तणनाशके व किटकनाशके यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सहलीसाठी प्रा. नवनाथ गोसावी यांचा सहभाग होता.
No comments:
Post a Comment