नवीन मराठी शाळा बार्शी येथे शाळा व्यवस्थापन समितीची सभा संपन्न
.png)
बार्शी (कटूसत्य वृत्त):- नवीन मराठी शाळा बार्शी येथे शाळा व्यवस्थापन समितीची सभा संपन्न झाली शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला नूतन उपाध्यक्ष म्हणून निलेश पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रसन्न देशपांडे व सचिव भानुदास लष्कर यांनी नवीन उपाध्यक्ष निलेश पवार आणि लक्ष्मण वाघमारे ज्ञानेश्वर खुणे अबूकर शेख बाळासाहेब ढेंबरे राधिका झांबरे प्रतिभा ढगे तेजस्विनी बावकर जयश्री शेळके मीरा कुलकर्णी संजीवनी रोकडे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी विक्रम थोरबोले व साक्षी काळे या सदस्यांचा सत्कार करण्यात आला शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्य शिक्षक व विद्यार्थी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी केली हर घर तिरंगा हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचे समितीने ठरवले शेवटी शाळेचे मुख्याध्यापक भानुदास लष्कर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment