विडी कामगारांकरीता फंड पैसे काढणे, वय दुरुस्ती, नाव दुरुस्ती, विडी पेन्शन याकरीताचे शिबीर संपन्न आ. प्रणिती शिंदे यांचा उपक्रम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 3, 2022

विडी कामगारांकरीता फंड पैसे काढणे, वय दुरुस्ती, नाव दुरुस्ती, विडी पेन्शन याकरीताचे शिबीर संपन्न आ. प्रणिती शिंदे यांचा उपक्रम

विडी कामगारांकरीता फंड पैसे काढणे, वय दुरुस्ती, नाव दुरुस्ती, विडी पेन्शन याकरीताचे शिबीर संपन्न आ. प्रणिती शिंदे यांचा उपक्रम

                सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दि. 01 ऑगस्ट 2022 रोजी आमदार प्रणिती शिंदे यांनी विडी कामगारांकरीता शिवमहेश्वरी मंदिर, गिरी झोपडपट्टी, दत्त नगर, सोलापूर येथे सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत विविध योजना शिबीराचे आयोजन केले होते.  

                दत्त नगर या भागामध्ये बहुसंख्य विडी कामगार असून त्यांचे विडी कारखान्यामध्ये कामगारांचे नांव, वय व इतर चुका असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांनी विडी कामगारांसाठी फंड पैसे काढणे, वय दुरुस्ती, नाव दुरुस्ती, विडी पेन्शनकरीता लागणारे कागदपत्रे दुरुस्ती करणे या शिबीराचे आयोजन केले होते. सदर शिबीराचा बहुसंख्य विडी कामगारांनी लाभ घेतला व आमदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानले. यावेळी प्राव्हीडंड फंड लेखाधिकारी, सोलापूर पवनकुमार ठाकूर, प्राव्हीडंड फंड लिपीक अक्षय पावडे, तिरुपती परकीपंडला, सतीश साळुंखे व बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages