१७ ऑगस्टला प्रांतकार्यालयासमोर दलित स्वयंसेवक संघाच्या हालग्या कडाडणार

बेसुमार खड्ड्याच्या विळख्यामुळे कुर्डुवाडी-माढा रस्त्याची लागली वाट
लऊळ (कटुसत्य वृत्त):- वर्षभरापासून कुर्डुवाडी-माढा रस्त्यावरील भोसरे,वडाचीवाडी,वेताळवाडी या गावालगतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे कित्येकदा तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी करून देखील फारसा फरक पडला नाही उलट डागडुजी केलेल्या ठिकाणीच भल्या मोठ्या खड्ड्याचा विस्तार पाहण्यास मिळतो तसेच रस्त्याची चाळण होऊन दररोज छोट्या मोठ्या अपघात होतात तसेच कुर्डुवाडी शहरातून माढा अनगर,मोहोळ व सोलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूकही भली मोठी आहे या रस्त्यावरून वैराग मानेगाव मालवंडी,रिधोरेसह आसपासच्या ग्रामीण भागात ये-जा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसही येथूनच धावत आहेत शहरी भागाबरोबरच वाडया वस्त्यावरील लोकांना न्यायालये तहसील भूमीअभिलेख नगरपंचायतीसह अन्य शासकीय निमशासकीये कार्यालयात जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे.
दररोज कार्यालयीन अधिकारी,कर्मचारी,विधिज्ञ,मजूर शाळकरी मुला-मुलींसह इतर मंडळी हे सकाळी दहाच्या सुमारास याच रस्त्यावरून आपापल्या कार्यस्थळावर मार्गस्थ होतात परंतु बेसुमार खड्ड्याचा विळखा व दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे कामकाजास विलंब होतो तसेच रेंगाळलेल्या अर्धवट कामामुळेही ऐन पावसाळ्याच्या दिवसात खड्यात पाणी साचून परिसर दुर्गंधीने व्यापला जातो व त्यातून तारेवरची कसरत करत मार्ग काढावा लागतो असे दिलेल्या निवेदनात म्हटले असून पत्रात नमूद केलेला रस्ता तयार न झाल्यास येत्या १७ ऑगस्ट रोजी प्रांतकार्यालयासमोर हलगी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे याबाबतचे निवेदन दलित स्वयंसेवक संघाचे जिल्हाप्रमुख दत्ताजी अडसूळ यांनी प्रांताधिकारी ज्योती कदम यांना दिले.
No comments:
Post a Comment