स्वातंत्र्याचा अमृत महोस्तवा निमित्त भव्य रॅलीव्दारे नागरिकांमध्ये जनजागृती - आ.प्रशांत परिचारक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 10, 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोस्तवा निमित्त भव्य रॅलीव्दारे नागरिकांमध्ये जनजागृती - आ.प्रशांत परिचारक

 स्वातंत्र्याचा अमृत महोस्तवा निमित्त भव्य रॅलीव्दारे नागरिकांमध्ये जनजागृती - आ.प्रशांत परिचारक


              पंढरपूर (कटुसत्य वृत्त): पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थीनी दिलेल्या देशभक्तीपर घोषणांनी पंढरपूर शहर परिसरात देशाभिमान फुलला.

              स्वातंत्र्याचा अमृत महोस्तवा निमित्त हर घर तिरंगा रॅलीची सुरवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरू होऊन प्रदक्षिणा मार्ग पुर्ण करून छत्रपती शिवाजी महारज चौक येथे राष्ट्रगीत गाऊन समाप्त करण्यात आली.

              रॅली मध्ये महसुल प्रशासन व कर्मचारी, पोलीस प्रशासन व कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी, तालुका कृषी अधिकारी व कर्मचारी, कवठेकर प्रशाला, आपटे हायस्कुल, कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेज, लोकमान्य विद्यालय, कर्मयोगी शाळा, उमा महाविद्यालय, राजाराज हायस्कुल, स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज, विवेक वर्धनी महाविद्यालय, विवेक वर्धनी शाळा, सरस्वती विद्यालय, द.ह.कवठेकर प्रशाला, अरिहंत इंग्लिश स्कुल, सखुबाई कन्या प्रशाला, गौतम विद्यालय इ. शाळा, महाविद्यालय व कॉलेज यांचा समावेश होता. या रॅलीमध्ये तिरंगा झेंडे, स्लोगन घोषवाक्य पाट्या तयार केल्या होत्या. या रॅलीमध्ये महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

आजच्या रॅलीमध्ये खास आकर्षण होते ते म्हणजे भारताच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 500 फुटाचा तिरंगा तयार केला होता. हा तिरंगा विद्यार्थांनी हाती घेवून मानवी साखळी करीत देशभक्तीच्या घोषणा दिल्या.

हा कार्यक्रम संपुर्ण देशभरात साजरा होत असून कोणत्याही एका धर्माचा नसून संपुर्ण देशाचा उत्सव आहे. या उत्सवात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत पंढरपूर शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या घरावर भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकावून अत्यंत उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहान मा.आ.प्रशांत परिचारक यांनी केले.

यावेळी आ.समाधान दादा आवताडे, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, नगरपरिषद अधिकारी अरविंद माळी, वसंत देशमुख, लक्ष्मण धनवडे, बब्रुवान रोंगे, भास्कर कसगावडे, गुन्नागीर गोसावी, सुनिल वाळूजकर, सतिश मुळे, लक्ष्मण शिरसट, प्रणव परिचारक, अनिल अभंगराव, लाला पानकर, विक्रम शिरसट, रोहन परिचारक, सुभाष मस्के, सुनिल भोसले भारतीय जनता पदाधिकारी, पंढरपूर शहरातील कार्यकर्ते, नागरिक व शिक्षक, शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages