बार्टीमार्फत राज्यातील पत्रकारांकरिता एक दिवसीय ॲट्रोसिटी कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन

मुंबई, (नासिकेत पानसरे): डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांकरिता “अनुसूचित जाती – अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 व सुधारित अधिनियम 2016” अंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे बुधवार दि. 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.00 ते सायं. 5.00 या वेळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सांस्कृतिक हॉल, दिक्षाभूमी रोड, श्रध्दानंद पेठ, नागपूर 440022 येथे आयोजित करण्यात आले असून या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पत्रकारांनी आपली नाव नोंदणी कार्यालयीन वेळेत दि. 12 ऑगस्ट २०२२ पर्यंत 8007385997 /8275730357 या क्रमांकावर करावी. दि. 12 ऑगस्ट २०२२ पर्यंत नोंदणी करता येणार आहे असे आवाहन बार्टी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment