तिरंगा रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद : सर्वत्र देशभक्तीमय वातावरण.!

कुर्डूवाडीत विद्यार्थ्यांसह नागरिकांची तिरंगा घेऊन प्रभात फेरी.!
कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- भारतीय जनता पार्टी व शिवप्रतिष्ठानच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष संजय टोणपे यांच्या नेतृत्वाखाली कुर्डूवाडी शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये विद्यार्थी,माजी सैनिक,नागरिक,तरूण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होते.
प्रारंभी टेंभुर्णी रोड येथील गावदेवी मंदिरापासून तिरंगा रॅलीचा प्रारंभ करण्यात आला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते माजी सैनिकांकडे तिरंगा ध्वज देऊन रॅलीला सुरुवात करण्यात आली.
अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक नागरीकाने घरावर तिरंगा ध्वज लावण्याबाबतची जनजागृती करण्यात आली.या रॅलीमध्ये माढा तालूका माजी सैनिक,के एन भिसे काॅलेजचे एनसीसीचे विद्यार्थी,आंतर भारती प्रशाला,नूतन विद्यालय,आदर्श पब्लिक स्कूल,जिव्हाळा संस्कार मंदिर,महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे विद्यार्थी तिरंगा ध्वज घेऊन देशभक्तीपर घोषणाबाजी करीत शहरात मोठ्या उत्स्फूर्तपणे रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
रॅली बालोद्यान चौक पोलीस स्टेशन मार्गे शिवाजी चौक,गांधी चौक,मिठाई गल्ली,टिळक चौक,पटेल चौक,पंजाब तालीम पासून शिवाजी चौकात रॅलीचा राष्ट्रगीत म्हणून समारोप करण्यात आली.उपस्थित सर्व शाळा काॅलेजचे विद्यार्थी व शिक्षकांचे आजी माजी सैनिक व नागरीकांचे आभार संजय दादा टोणपे यांनी मानले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे गोविंदराव कुलकर्णी,दत्तात्रय मोरे, शहराध्यक्ष शंकर बागल,प्रदीप पाटील,आण्णा ढेकळे,संतोष क्षिरसागर,तानाजी काटे,कॅप्टन अजिनाथ बोबडे,दत्ता ढवळे,नानासाहेब ढवळे,महादेव बागल,नितिन गडधरे,बबन ताकभाते,नारायण भोईटे,श्रीधर करण भगत,अनंता राऊत,प्रवीण सोमासे,आदि मान्यवर उपस्थित होते.
रॅली यशस्वी करण्यासाठी शिवप्रतिष्ठानचे सागर कोले,निलेश सुराणा,मच्छिंद्र कदम,भिमराव रावडे, क्षितिज टोणपे,सौरभ परबत,सौमित्र परबत,प्रसाद आतकर,शंभूराजे दास,समीर शेख,युवराज कोळी, कुलदीप बारंगळेस यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment